अकोला, दि :- माजी सैनिकी मुलामुलींचे वसतीगृह येथे तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, माजी सैनिक पत्नी प्रवर्गातील कंत्राटी पद्धतीने विविध पदावर पदभरती होणार आहे. या पदभरतीकरीता इच्छुक पात्रताधारकांनी गुरुवार दि. 21 जुलैपर्यंत अर्ज करावा. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इच्छुक अर्जदारांनी गुरुवार दि. 28 जुलै रोजी स्वखर्चाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथे सकाळी 11 वाजता सर्व कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले.
सैनिक मुलांचे वसतीगृहातील अशासकीय सहायक वसतीगृह अधिक्षक पदाकरीता माजी सैनिक प्रवर्गातील दहावी पास व एमएससीआयटी शैक्षणिक पात्रता आवश्यक असून या पदाकरीता 9 हजार 902 रुपये प्रतीमहा मानधन राहिल. अशासकीय चौकीदार(निवासी पद), अशासकीय सफाईवाला व अशासकीय माळी पदाकरीता माजी सैनिक व इतर नागरिक प्रवर्गातील आठवी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक असून या पदाकरीता अनुक्रमे 8 हजार 911 रुपये प्रतीमहा, 5 हजार 658 रुपये प्रतीमहा व 4 हजार 920 रुपये प्रतीमहा मानधन राहिल. अशासकीय स्वयंपाकी महिला पदाकरीता माजी सैनिक पत्नी, विधवा व इतर नागरिक प्रवर्गातील आठवी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक असून या पदाकरीता 5 हजार 941 रुपये प्रतीमहा मानधन राहिल.
सैनिक मुलींचे वसतीगृहातील अशासकीय सहायक वसतीगृह अधिक्षक(निवासी) पदाकरीता विरपत्नी, माजी सैनिक पत्नी/विधवा व इतर नागरीक प्रवर्गातील दहावी पास व एमएससीआयटी शैक्षणिक पात्रता आवश्यक असून या पदाकरीता 12 हजार 872 रुपये प्रतिमहा मानधन राहिल. अशासकीय सहायक वसतीगृह अधिक्षक पदाकरीता विरपत्नी, माजी सैनिक पत्नी/विधवा व इतर नागरीक प्रवर्गातील दहावी पास व एमएससीआयटी शैक्षणिक पात्रता आवश्यक असून या पदाकरीता 9 हजार 902 रुपये प्रतीमहा मानधन राहिल. अशासकीय सफाईवाला, अशासकीय माळी, अशासकीय स्वयंपाकी महिला व अशासकीय चौकीदार(निवासी) महिला पदाकरीता विरपत्नी, माजी सैनिक पत्नी/विधवा व इतर नागरीक प्रवर्गातील आठवी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक असून या पदाकरीता अनुक्रमे 5 हजार 658 रुपये प्रतीमहा, 4 हजार 920 रुपये प्रतीमहा, 5 हजार 941 रुपये प्रतीमहा व 4 हजार 920 रुपये प्रतीमहा मानधन राहिल.
इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा सहकारी कृषी ग्रामिण बँक मया. इमारत, अकोला येथे अर्ज करावा. तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील दुरध्वनी क्रमांक 0724-2433377 व अधिक्षक सैनिकी मुलांचे वसतीगृह येथील दुरध्वनी क्रमांक 0724-2456062 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.