अकोला, दि.1 : गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 5.5 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला असून काल (दि.30) रोजी आलेगाव ता. पातूर शिवारात वसंत माधव तेलगोटे (वय-70वर्षे) या वृद्धाचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे मौजे अंबाशी ता. पातुर येथे ब्रह्मदेव रामभाऊ लाहोळे यांच्या राहत्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराचे नुकसान झाले आहे, या घटनेत जिवीत हानी मात्र झाली नाही, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले आहे.