अकोला प्रती- अकोला शहरातील पेट्रोल पंप २४ तास सुरू न ठेवणाऱ्या पेट्रोल पंप चालकावर कारवाई करा अशि मागणी प्रा.संजय खडसे साहेब निवासी उपजिल्हाधिकारी अकोला यांना उमेश सुरेशराव इंगळे (महाराष्ट्र अध्यक्ष परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य) व सतिश तेलगोटे (महाराष्ट्र सचिव परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेले काही पेट्रोल पंप चालक आपली मनमानी करत आहेत.
पेट्रोल पंप बाहेर 24 तास सेवा अशा आशयाचे फलक लावले असून काही पेट्रोल पंप रात्री साडे दहा अकरा वाजताच बंद करण्यात येत आहेत. यामुळे रात्री-बेरात्री प्रवास करणाऱ्या वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून 24 तास पेट्रोल पंप सुरू न ठेवणाऱ्या पेट्रोल पंप चालकावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य पेट्रोल पंप चालकाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ सावळे, विकास शेगोकार, उमेश शेजे,मयुर सरदार,आदि पदाधिकारी उपस्थित होते.