मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यावर्षी मृग नक्षत्र कोराडाच गेला असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मृगात पावसाचा एकही थेंब पडला नसल्याने शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली. मात्र आता काही ठिकाणी तुरळक पावसाला सुरवात झाली आहे.

यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, आता हवामान खात्यानं आणखी एक ट्वीट करत पावसाची माहिती दिली आहे. 24 ते 26 तारखे दरम्यान कोकण, गोवा आणि किनारी कर्नाटकातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 24 आणि 25 रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि 25 जून रोजी दक्षिण गुजरात राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाचा लंपडाव सुरु आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. (maharashtra News) आता पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा एकदा काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (rain update konkan) यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.