अकोला,दि.23: महिला व बालविकास विभाग व जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाच्या वतीने शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रम, सुर्यादय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह, जागृती जागृती शासकीय महिला राज्यगृह संस्थेतील प्रवेशीतांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन मंगळवारी (दि.21) रोजी पार पडले. या शिबीरात आरोग्य तपासणी, आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छते विषयी महिलांना मार्गदर्शन केले. या आयोजनासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर, शासकीय बालगृहाचे अधिक्षक जयश्री वाढे, सुर्यादय बालगृहाचे प्रकल्प समन्वयक शिवराज खंडाळकर, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भारसाळे, जागृती शासकीय महिला राज्यगृहाचे सुरेश चोमडे यांनी परिश्रम घेतले.महिला व बालविकास विभाग व जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाच्या वतीने शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रम, सुर्यादय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह, जागृती जागृती शासकीय महिला राज्यगृह संस्थेतील प्रवेशीतांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन मंगळवारी (दि.21) रोजी पार पडले.
या शिबीरात आरोग्य तपासणी, आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छते विषयी महिलांना मार्गदर्शन केले. या आयोजनासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर, शासकीय बालगृहाचे अधिक्षक जयश्री वाढे, सुर्यादय बालगृहाचे प्रकल्प समन्वयक शिवराज खंडाळकर, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भारसाळे, जागृती शासकीय महिला राज्यगृहाचे सुरेश चोमडे यांनी परिश्रम घेतले.