तेल्हारा (प्रतिनिधी) तेल्हारा टाऊन शेगाव रोड येथे दि. 21 जून रोजी दुपारी 3 वाजताचे सुमारास राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तेल्हारा चे सहाय्यक अभियंता आकाश गुप्ता हे कर्मचाऱ्यांसह थकीत वीज बिल वसुली कामी गेले असता वीज ग्राहक असलेल्या आरोपीच्या फर्निचर दुकानात तपासणी करताना वीज मीटरमध्ये अवैध फेरफार केल्याचे आढळून आल्याने याबाबत विचारणा केल्याने आरोपी नामे शेख जाकीरखाँ लालखाँ शेख जमीरखाँ लालखाँ रा तेल्हारा यांनी यांनी सहाय्यक अभियंत्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व महावितरण च्या मालकीचे विद्युत मीटर तपासणीसाठी काढले असता आरोपींनी हातातून हिसकुन रोडवर आपटून फोडले.
या प्रकरणी तक्रारीवरून तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. फिर्यादी आकाश अजय कुमार गुप्ता सहाय्यक अभियंता रा. वि. वि. कंपनी मर्यादित तेल्हारा यांनी आरोपी शेख जाकीरखा लालखा, शेख जमीरखाँ लालखाँ रा. तेल्हारा यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा करून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विषयांतर्गत तेल्हारा पो. स्ट. मध्ये तक्रार नोंदविली आहे. नमूद आरोपीचे शेगाव रोड तेल्हारा डाऊन मध्ये फर्निचरचे दुकान असून फिर्यादी हे थकीत वीज बिल वसुली करणेकामी दि.21 जून रोजी दुपारी 3 वाजेपुर्वी कर्मचार्यांसह गेले विजेचे मीटर तपासणी त्यात अवैध फेरफार करण्यात आल्याची बाब फिर्यादी यांच्या लक्षात आली असता याबाबत नमूद आरोपी यांना विचारणा केली असता आरोपींना फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली.
तपासणीसाठी काढलेले वीस मीटर अभियंता फिर्यादीच्या हातातून आरोपींनी रोडवर आपटून तोडले फिर्यादी सोबत असणारे वीज कर्मचारी नामे निलेश होमपारखे,कमलेश गासे यांनी आरोपींना समजण्याचा प्रयत्न मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती तेल्हारा पोलिसांना दिली व पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला दि.21जून च्या दुपारी 3 वाजे दरम्यान घडलेल्या घटनेची फिर्याद सायंकाळी सव्वा सहा वाजले दरम्यान गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एक आरोपी अटक तर एक फरार असून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता अधिनियम 1860 चे कलम 353, 332, 427, 294 506, 34 तसेच भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) 2003 चे कलम 135, 138 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सपोनि ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.