अकोला,दि.21: शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मध्ये सामायिक परीक्षेच्या माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छितात त्या मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापले जात पडताळणीचे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा जातपडताळणीसमितीचे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात पडताळणी समिती विजय साळवे यांनी केले आहे.
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः तीन महिन्यांच्या आत निर्णय घेतला जातो. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्रा अभावी कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी त्वरीत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.