अकोला,दि.21 : पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वीज कोसळण्याबाबतची पूर्वसुचना प्राप्त व्हावी यासाठी ‘दामिनी’ हे ॲप तयार केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी, ग्रामस्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच गावातील सामान्य नागरिक यांनी दामिनी ॲप डाऊन लोड करावे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.
या ॲपमुळे वीज कोसळण्याच्या 15 मिनीटे आधी वीज कोसळण्याची स्थिती व ठिकाण दर्शविले जाते. तेव्हा दामिनी ॲपच्या माध्यमातून प्राप्त सुचनेचा वापर आपल्या परिसरातील नागरिकांना खबरदारीची पूर्वसुचना देण्यासाठी करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.