तेल्हारा (प्रतिनिधी)- पावसाळा म्हटला की प्रशासनाला जाग येते ती नाले सफाईची विषय येतो मग पावसाळ्यात फक्त नालेसफाईचे काम करायचे का गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील नाले सफाई करण्यात आली नव्हती. ती जिल्हाधिकारी यांचे आदेश धडकल्यानंतर बऱ्याच दिवसांनी तेल्हारा न प प्रशासनाला जाग आली जाग आली. हे महत्वाचे मात्र नाले सफाई करतात एक म्हण आहे. “थुक्याला थुका लावणे” अशा प्रकारचे काम सुरू असून नाले सफाई करत असताना कुठल्याही नागरिक प्रवाशी व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये हा उद्देश असायला हवा मात्र त्याला हरताळ नाही मिळाली तर मग झालेच शहरातील बस स्टँड ते इंदिरा नगर पर्यंत चे नालेसफाईचे काम सुरू आहे. नाले सफाई चे काम झाले मात्र नाल्यामधील घाण दुर्गंधी युक्त कचरा तीन ते चार दिवसांपासून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पडलेला होता आज तो साफ करण्याचे काम न प कडून करण्यात आले.
मात्र अद्यापही त्या ठिकाणी दुर्गंधी युक्त कचरा जैसे थे आहे न प कर्मचारी यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी बोलले असता आम्ही ओला कचरा भरू शकत नाही, असे बोलण्यात आले. मात्र साफ सफाई ही दाम पुरती आहे की कामा पुरती हे मात्र समजण्यापलीकडे आहे.कारण शहरात अनेक असे गटार असून त्यामुळे पावसाळ्याच्या टाईमवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते मात्र न प कडे तक्रार केली असता, आम्ही बघतो असे उत्तर शहरातील अनेक नागरिकाना देण्यात येते. जर लाखो रुपये खर्ची होत असतील तर कामे का होत नाही. नागरिकाना का आपली तक्रार घेऊन यावे लागते मग न प प्रशासनामध्ये काम करीत असलेले अधिकारी हे करतात तरी काय हा प्रश्न निर्माण होत आहे. तेल्हारा शहरातील नागरिकांच्या पैशांचा चुराळा होत असेल तर आपण या मुख्य बाबी कडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अरोरा व न प प्रशासन अधिकारी गुरव लक्ष देतील का याकडे लक्ष लागले आहे.