म्हैसांग (प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील आपातापा फिल्ड वीज वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या भोंगळ कारभारामुळे म्हैसांग, कट्यार, गोनापूर, मजलापूर, रामगाव, आपातापा या गावातील नागरिकांना काही कारण नसतांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे.
काही कारण नसतांना येणं उन्हाळ्यात वीजपुरवठा दिवसभर खंडित होतो, त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. या कार्यालयाचा कारभार अतिरिक्त अभियंता यांच्या भरवशावर सुरू आहे, तरी येथे पूर्णवेळ अधिकारी वर्गाची नेमणूक करा, अशी नागरिक मागणी करत आहे.
तसेच वायरमन हे मद्यपान करून कामावर येतात,तरी यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि वरीष्ठ वीज वितरण अधिकारी यांनी या भोंगळ कारभाराकडे देण्याची गरज आहे.
या कार्यालयाचा अडिशनल चार्जे दिल्यामुळे कोणी अधिकारी येथे येत नाही, सतत लाईट बंदच रहाते,त्यामुळे नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतो. यावर कोणीही दाखल घेत नाही आहे, तरी पाणी वारे नसूनही लाईट जाते. वायरमन येऊन सुद्धा बघत नाही आणि कार्यालयास फोन करून कोणी विचारलं तर उडवा उडवी चे उत्तरे देतात आणि तरीही सतत लाईट बंदच रहाते वरिष्ठ अधिकार पण काही लक्ष देत नाही आहेत. आणि पहिले आपटापा येथे अडिशनल चार्जे न देता तिथे पर्मनंट चार्जे देण्यात यावा व योग्य वायरमन देण्यात यावा असे गावकरिंचे मागणी आहे नाहीतर आम्ही आंदोलनाला बसू असा इशारा गावकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते निखिल देशमुख, गुड्डु पाटील गावंडे, चेतन बाबुळकर, वसत कर्णकर,रितेश काळे, ऋषीं देशमुख, सागर देशमुख, शुभम लव्हाळे, निलेश खराटे,आकाश पिपरे, धीरज गावंडे, दिनेश जैस्वाल, छोटू पिपरे, मिथुन गवई, रुपेश कट्यारमन, रामा बावणे, रवी लव्हाडे, प्रणय लव्हाळे, बाबू भामोद्रे,अंकित कुटास्कर आदीनी दिला आहे.