अकोला (प्रतिनिधी)- दि. १५/०६/२०२२ रोजी संतोष महल्ले पोलिस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा यांना माहीती प्राप्त झाली की, सध्या मान्सुन पेरणी हंगाम चालु असुन बाजारात मोठया प्रमाणात प्रमुख खत उत्पादनाचा तुडवडा असताना एक इसम एम. आय. डी. सी. अकोला येथे बनावट खत बनवुन बाजारात विक्री करून शेतक-यांची व शासनाची फसवणुक करीत आहे. अशा माहीतीवरून मा. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर साहेब यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे पोउपनि गोपाल जाधव व पथक स्थानीक गुन्हे शाखा आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी अकोला यांचे संयुक्त पथकाने अकोला येथील एम. आय. डी. सी. फेज ४ मधिल एम. आर. फर्निचर मॉल चे बाजुला असलेल्या भंगार गोडावुन चे बाजुचा गोडावून मध्ये मिळालेल्या माहीती प्रमाणे कार्यवाही केली असता त्याठिकाणी आरोपी नामे राहुल नामदेव सरोदे वय ३५ वर्षे रा. नगर परिषद कॉलणी गौरक्षण रोड, अकोला हा अवैधरित्या बनावट खताचे उत्पादन करताना मिळून आला.
त्याचे कडुन सरदार डी. ए. पी. खत, आय पी एल डीएपी खत, महाधन १८:४६:० असा नामवंत खताचे पॅकिंग साठी वापरात येण्या या नवीन प्लास्टीक बारदाना, पॅकीग मशीन, बनावट रासायनिक खताचा माल, किटकनाशक बॉटल, बनावट हायब्रीड सुमो ग्रानुल्स्, सोडीयम सल्फेट चा कच्चा माल, इमलसीफायर लिक्वीड, खत बनविण्यासाठी वापरात येणारे मिक्सर मशीन, निम सीड्स कर्नल ऑईल असा एकुण २०,०५,७३०/- रु मुददेमाल जप्त करण्यात आला असुन पो.स्टे. एम. आय. डी. सी. अकोला येथे कलम ४२० भा.द.वि. सह कलम ७, १९, २१ खत नियंत्रण आदेश १९८५, कलम ३,९ अत्यावश्यक वस्तु कायदा १९६८ कलम ९३ किटकनाशक नियम १९७१ कलम ४,६,९,१०,१५ किटकनाशक आदेश १९८६ प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी नामे राहुल नामदेव सरोदे वय ३५ वर्षे रा. नगर परिषद कॉलणी गौरक्षण रोड, अकोला यास अटक करण्यात आली. आरोपी याने सध्या खरीप हंगाम पेरणीचा कालावधीत मोठया प्रमाणावर रासायनिक खताचा तुटवडा असताना बाजारात विक्री करिता बनावट खत तयार करण्याचे साहित्य मिळून आल्याने आरोपी विरुद्ध सदर ची कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीधर सा, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत मॅडम, पो.नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गोपाल जाधव, ए. एस. आय. दशरत बोरकर, नितीन ठाकरे, नापोकों गोकुळ चव्हाण, पो. कॉ. लिलाधर खंडारे, पो. का स्वप्निल खेडकर, पो. कॉ. अन्सार नापोकॉ अक्षय बोबडे तसेच श्री डॉ एम. बी इंगळे, कृषी विकास अधिकारी जि. प. अकोला, श्री एम. डी. जंजाळ मोहिम J अधिकारी, एन एस लोखंडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, श्री एस. आर. जांभरूणकर, तालुका कृषी अधिकारी थ कु. रोहिणी मोघाड, कृषी अधिकारी पं. स. अकोला यांनी केली.