अकोला, ता. 15: कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे आज मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात एकूण 232 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात एकूण 178 प्रशिक्षणार्थींची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या मेळाव्यात बडवे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, युवा शक्ती फाउंडेशन पुणे, डिजीटल वर्ल्ड एज्युकेशन अकोला, प्रधानमंत्री कौशल केंद्र अकोला, जम्बो मार्ट प्रायव्हेट लिमिटेड अकोला या आस्थापनांनी सहभाग घेतला. मुलाखतीनंतर युवाशक्ती फाऊंडेशन पुणे यांनी जवळपास 90 कंपन्यांसाठी 48 प्रशिक्षणार्थांची प्राथमिक स्वरूपात निवड केली. टिमप्लस एच आर.यांनी 11 कंपन्यांसाठी 40 प्रशिक्षणार्थांची निवड केली. बडवे इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी 90 उमेदवारांची प्राथमिक स्वरूपात निवड केलेली आहे. राष्ट्रीय अप्रेंटीसशीप मेळाव्याचे आयोजन दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी करण्यात येते, अशी माहिती प्राचार्य पी.एन. जयस्वाल यांनी दिली. या मेळाव्यासाठी उपप्राचार्य एस.आर.ठोकरे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. बी.घोंगडे, तसेच गटनिदेशक, शिल्पनिदेशक एस. एम.पिसे, एस.पी वानखेडे. उज्वल राठोड यांनी परिश्रम घेतले.