• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, August 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा

Our Media by Our Media
June 10, 2022
in Featured, अकोला, फिचर्ड, संपादकीय
Reading Time: 1 min read
120 2
0
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा
17
SHARES
869
VIEWS
FBWhatsappTelegram

येत्या काही दिवसांतच मान्सूनच्या पावसाला सुरवात होईल. कोरोना विषाणूच्या सावटात यंदाच्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून सावध राहण्याची अधिक गरज आहे. त्याचप्रमाणे घरातील वीज उपकरणे व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जाणते-अजाणतेपणी झालेली क्षुल्लक चूक सुद्धा विद्युत अपघातासाठी कारणीभूत ठरू शकते

पाणी विजेचे वाहक – खबरदारी महत्वाची!

हेही वाचा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे पातुरात भव्य स्वागत

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व तात्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मिटरची जागा बदलून घ्यावी. पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डचा आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

पावसाळयात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज उपकरणे अशा ओलाव्यापासून दूर ठेवावीत. तसेच अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. जेणेकरुन त्यात पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही. कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा यंत्रणेला बांधू नये.

फ्यूज तार म्हणून तांब्याची तार धोक्याची

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

जुनाट वायरिंग व अर्थींग तपासणे आवश्यक

वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या तारांची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व वीज उपकरणांची अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.

आकाशातील विजेचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. वीज पडल्यास त्या भागातील विद्युत प्रवाहाचा उच्चदाब वाढून विद्युत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होवू शकते. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी.

सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावधान

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा लागतो.

विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा. दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी. वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर इन्सुलेशन टेप लावावी.

महावितरणचे अभियंते व जनमित्रांची कसोटीच

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचे तांत्रिक दोष शोधणारे, दुरुस्तीचे काम करणारे महावितरणचे अभियंते व जनमित्र यांच्यासाठी पावसाळा अतिशय आव्हानात्मक असतो.

वीजपुरवठा खंडित होण्याची विविध कारणे

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांची विजेअभावी गैरसोय होते.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. याशिवाय मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईट किंवा ट्वीटरद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्याची सोय आहे. महावितरणकडे वीजग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. तसेच ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303

– पवनकुमार कछोट

अधीक्षक अभियंता,अकोला

(लेखक महावितरण अकोला विभागाचे अधीक्षक अभियंता आहेत.)

Previous Post

Rajya Sabha Election 2022: “…तर आम्ही विरोध करण्याचे कारण नाही”; MIM च्या भूमिकेवर संजय राऊत (Sanjay Raut)स्पष्टच बोलले

Next Post

प्रतिबंधीत प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्‍या मुर्ती विक्री प्रकरणी कारखान्यावर कारवाई

RelatedPosts

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे पातुरात भव्य स्वागत
अकोला जिल्हा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे पातुरात भव्य स्वागत

August 2, 2025
अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड
Featured

अकोला शहर वाहतुक शाखेची बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई, १,८१,४००/- रू दंड

August 1, 2025
गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
Featured

गुटका माफियांच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

August 1, 2025
अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Featured

अट्टल दुचाकी चोरट्यास अटक पोलिसांची कारवाई सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2025
अकोला
Featured

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

July 31, 2025
शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र
Featured

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

July 30, 2025
Next Post
प्रतिबंधीत प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्‍या मुर्ती विक्री प्रकरणी कारखान्यावर कारवाई

प्रतिबंधीत प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्‍या मुर्ती विक्री प्रकरणी कारखान्यावर कारवाई

12 जूनला बाल कामगार विरोधी दिवस – 14 वर्षाखालील बालकास कामावर ठेवू नये; कामगार विभागाचे आवाहन

12 जूनला बाल कामगार विरोधी दिवस - 14 वर्षाखालील बालकास कामावर ठेवू नये; कामगार विभागाचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

अकोला

जिल्हा परिषदेच्या उपकरातून अंमलबजावणी, मागासवर्गीय व्यक्ती व दिव्यांगांसाठी विविध योजना

July 31, 2025
जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भावामुळे ,आदेश लागू

July 28, 2025
शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण – ‘महावितरण’ चे अध्यक्ष लोकेश चंद्र

July 30, 2025
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे पातुरात भव्य स्वागत

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींचे पातुरात भव्य स्वागत

August 2, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.