अकोला, दि. 9 :- हरभरा खरेदीचे भारतीय अन्न महामंडळाकडे शिल्लक राहिलेला उद्दिष्ट नाफेडकडे वर्ग करुन जिल्ह्यांना वितरीत करण्यात आले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्याकरीता 15 हजार क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
हरभरा खरेदी केवळ शेतकऱ्यांचा होणार आहे. त्याचबरोबर सातबारा उताऱ्यावरील फक्त हरभऱ्याचा लागवडीखालील क्षेत्राच्या प्रमाणात उत्पादनानुसार हरभरा खरेदी होईल याची दक्षता घ्यावी, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव डॉ.सुग्रिव धपाटे यांनी कळविले आहे.