अकोला (प्रतिनिधी)- ‘हेरवाड पॅटर्न’ प्रमाणे “स्वामिनी पॅटर्न” वापरुन विधवांना सार्वजनिक वटपौर्णिमा पुजनाला शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी स्वामिनी विधवा विकास मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र आणि ईमेलद्वारे केली आहे.
वीरस्री स्व. लताताई देशमुख प्रेरित स्वामिनी संघटना आणि स्वामिनी विधवा विकास मंडळ सन २००४ पासून विधवा, घटस्फोटीता, परीत्यत्या, जरठ कुमारीका आणि पडित अशा महिलांसाठी विना अनुदानित कार्यरत आहे. देशातील पहिले सार्वजनिक विधवा वटसावित्री पूजन सन २०११ ला शासनाच्या परवानगीने अकोला येथे पोलीस बंदोबस्तात साजरे केले . या उपक्रमाची प्रेरणा घेत आता अनेक ठिकाणी विधवांकरिता वटपौर्णिमा पूजन साजरी होत आहेत पण आजही बऱ्याच ठिकाणी सामाजिक बंधनांमुळे विधवांना वटपौर्णिमेचे सारख्या पूजनाला जाऊ दिले जात नाही. विधवांनी वडाची पूजा करणे निषिद्ध मानले जाते. यावर उपाय म्हणुन महाराष्ट्र शासनाने याबाबत कडक नियमावली करून सार्वजनिक विधवा वटपौर्णिमा पूजनास कायदेशीर मान्यता देऊन राज्यातील तमाम विधवांचा सन्मान करुन महिला सक्षमीकरण करावे, त्यासाठी येत्या १४ जुन २०२२ वटपौर्णिमेपासुन आपला “स्वामिनी पॅटर्न” राज्यभर राबवावा, असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
स्वामिनी संघटनेच्या मागण्या वटपौर्णिमेला विधवांना वटपूजन करण्यास कोणीही बंधने घालू नये. सार्वजनिक ठिकाण सौभाग्यवती महिलांनी विधवा महिलांना सन्मानाने वटवृक्ष पुजन करण्यासाठी जागा द्यावी. विधवा महिलांचा वट पूजन करताना कोणीही अपशब्द बोलून अपमान करू नये.
शासनाने वटपौर्णिमा पूजनाचे परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत, नगर पंचायत तसेच महानगरपालिका आदी क्षेत्रात याबाबत आदेश जारी करून विधवांना वटपौर्णिमा पूजनाचा सन्मान द्यावा- ‘हेरवाड पॅटर्न’ प्रमाणे “स्वामिनी पॅटर्न” वापरुन विधवांना सार्वजनिक वटपौर्णिमा पुजनाला शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी स्वामिनी विधवा विकास मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र आणि ईमेलद्वारे केली आहे.
वीरस्री स्व. लताताई देशमुख प्रेरित स्वामिनी संघटना आणि स्वामिनी विधवा विकास मंडळ सन २००४ पासून विधवा, घटस्फोटीता, परीत्यत्या, जरठ कुमारीका आणि पडित अशा महिलांसाठी विना अनुदानित कार्यरत आहे. देशातील पहिले सार्वजनिक विधवा वटसावित्री पूजन सन २०११ ला शासनाच्या परवानगीने अकोला येथे पोलीस बंदोबस्तात साजरे केले . या उपक्रमाची प्रेरणा घेत आता अनेक ठिकाणी विधवांकरिता वटपौर्णिमा पूजन साजरी होत आहेत पण आजही बऱ्याच ठिकाणी सामाजिक बंधनांमुळे विधवांना वटपौर्णिमेचे सारख्या पूजनाला जाऊ दिले जात नाही. विधवांनी वडाची पूजा करणे निषिद्ध मानले जाते. यावर उपाय म्हणुन महाराष्ट्र शासनाने याबाबत कडक नियमावली करून सार्वजनिक विधवा वटपौर्णिमा पूजनास कायदेशीर मान्यता देऊन राज्यातील तमाम विधवांचा सन्मान करुन महिला सक्षमीकरण करावे, त्यासाठी येत्या १४ जुन २०२२ वटपौर्णिमेपासुन आपला “स्वामिनी पॅटर्न” राज्यभर राबवावा, असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
स्वामिनी संघटनेच्या मागण्या वटपौर्णिमेला विधवांना वटपूजन करण्यास कोणीही बंधने घालू नये. सार्वजनिक ठिकाण सौभाग्यवती महिलांनी विधवा महिलांना सन्मानाने वटवृक्ष पुजन करण्यासाठी जागा द्यावी. विधवा महिलांचा वट पूजन करताना कोणीही अपशब्द बोलून अपमान करू नये. शासनाने वटपौर्णिमा पूजनाचे परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत, नगर पंचायत तसेच महानगरपालिका आदी क्षेत्रात याबाबत आदेश जारी करून विधवांना वटपौर्णिमा पूजनाचा सन्मान द्यावा.