अकोला,दि.1– महिला व बालविकास विभागातर्गंत एकात्मीक बालविकास प्रकल्प व तहसील कार्यालय बाळापुर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी(दि.30) नगरपरीषद बाळापुर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात कोरोना मुळे विधवा झालेल्या महिलांना मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ एका छताखाली देण्यात आली.
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलानां विविध योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा याकरीता ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मिशन वात्सल्य समितीचे गठन करण्यात आले. या समितीत तहसीलदार अध्यक्ष असुन बालविकास प्रकल्प अधिकारी हे सदस्य सचिव तर 13 विभागाचे अधिकारी या समितीमध्ये सदस्य आहेत. शासनाच्या 24 प्रकारच्या योजनाचा समावेश मिशन वात्सल्य अंतर्गत करण्यात आले आहे. बाळापूर येथील मेळाव्यात बालसंगोपन योजनेचे 22, संजय गांधी निराधार योजनेचे 24 व राशन कार्डचे 17 प्रस्ताव स्विकारण्यात आले. तर दोन अर्जदारांना मेळाव्यामध्येच राशनकार्ड वितरीत करण्यात आले. शिबीरामध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना विविध विभागांच्या प्रतिनींधींनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेबाबत माहीती दिली. या शिबीरामध्ये बाळापुरचे तहसीलदार सैयद अयसानोदीन, बालविकास प्रकल्प अधिकारी भारती लांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे अश्विन डाबेराव, विस्तार अधिकारी गौतम बडगे, पुरवठा विभागाचे सुनिता वाघमारे, वंदना मेहसरे, दिपाली इंगोले, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे नितीन अहीर, योगेंद्र खंडारे आदि उपस्थित होते.