अकोला,दि.1– सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअतंर्गत बार्शिटाकळी तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. या शासकीय वसतीगृहात आठवी ते बी.ए. भाग-1 च्या विद्यार्थ्यांना विनामुल्य सोईसुविधा पुरविल्या जाणार आहे. प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन बार्शिटाकळी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल के. एम. तिडके यांनी केले आहे.
वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून सर्व सोईसुविधा विनामुल्य राहिल. त्यात सकाळी नास्ता, दुध, फळ किंवा अंडे देण्यात येईल. जेवनामध्ये वरण, भात, पोळी, सलाद, पापड, तुप, तसेच आठवड्यातुन दोन दिवस मासाहार जेवन दिल्या जाईल. शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोईसुविधामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा, महाविद्यालयात असलेल्या गणवेश वसतीगृहामार्फत पुरविण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता, स्टेशनरी भत्ता व रेनकोट भत्ता देण्यात येईल. वसतीगृहात प्रवेशीत विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता वेगळी अभ्यासिका आहे. तसेच त्यांना संगणक हाताळणी, ई-लायब्ररी इ. सुविधा दिल्या जातात. वसतीगृहात प्रवेश प्रवर्गानुसार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अंपग व अनाथ याप्रमाणे दिल्या जाईल.