• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आजपासून (दि.1 जून) बियाणे महोत्सवास प्रारंभ; 826 शेतकऱ्यांनी केली बियाणे विक्रीसाठी नोंद

Our Media by Our Media
May 31, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड, शेती
Reading Time: 1 min read
126 1
0
आजपासून (दि.1 जून) बियाणे महोत्सवास प्रारंभ; 826 शेतकऱ्यांनी केली बियाणे विक्रीसाठी नोंद
49
SHARES
910
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.31: पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती बियाणे विक्री महोत्सवाचे आयोजन बुधवार दि.1 जूनपासून प्रत्येक तालुक्याच्या बाजार समितीत करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तयार केलेले घरगुती बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असेल तर हेच घरगुती बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. जिल्ह्यात तब्बल 826 शेतकऱ्यांनी या महोत्सवात बियाणे विक्री करण्यासाठी नोंद केली आहे. त्यासोबतच 22 शेतकरी कंपन्याही सहभागी होणार आहेत. शुभारंभाचा कार्यक्रम अकोट येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार असून अन्य तालुक्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उद्घाटन सोहळा होणार आहे.

शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोस्तवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते बुधवार दि.1 जून रोजी सायंकाळी पाच वा. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे होणार आहे. अन्य तालुक्यातील शुभारंभही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होईल. या बियाणे महोत्सवात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळा अकोट येथे होणार असून स्थानिक पातळीवर आमदार महोदय सहभागी होतील. मुख्य सोहळ्यात अकोट येथे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या समवेत विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या नियोजनाबाबत अधिक माहिती देतांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत म्हणाले की, जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती करण्यात आली. या महोत्सवात बियाणे विक्री करण्यासाठी 826 शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. तर 22 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नोंद केली आहे. त्यात अकोला येथे 113, बार्शी टाकळी येथे 150, मुर्तिजापूर येथे 92, पातुर येथे 76, बाळापूर येथे 120, तेल्हारा येथे 150, अकोट येथे 125 असे एकूण 826 शेतकरी तर जिल्ह्यात एकूण 22 शेतकरी कंपन्या अशा एकूण 848 जणांनी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी 284 स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या महोत्सवात सोयाबीन, तुर, उडीद, मूग,कांदा, भाजीपाला पिके इ. बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्यात आले आहे.

आता पेरणीचा हंगाम जवळ आला आहे. मान्सुनही बऱ्यापैकी जवळ आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महोत्सवात आपल्या जवळील बियाणे विक्री करावे व ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ते खरेदीही करावे.

या महोत्सवात बियाणे प्रक्रिया करणे, त्यात रासायनिक व जैविक प्रक्रिया करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिकेही दिली जाणार आहेत. विक्री करावयाचे बियाणेही उगवण क्षमता तपासूनच विक्रीसाठी आणण्यात येतील, याचे नियोजन आहे. बियाणे उगवणीचे प्रात्यक्षिकही विक्रीच्या ठिकाणी दिले जाईल,असेही डॉ. खोत यांनी सांगितले.

Tags: Akolabacchu kadufarmers
Previous Post

वादळी पावसामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रद्द; इंटरनेट सेवा ठप्प

Next Post

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

विशेष लेखः- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला: दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षणाची अखंडीत परंपरा

विशेष लेखः- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला: दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षणाची अखंडीत परंपरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.