अकोला-गेल्या काही वर्षांपासून अकोला हे पश्चिम विदर्भातील शैक्षणिक हब म्हणून उदयास आले असून विदर्भ, मराठवाडा मधून विद्यार्थी अकोला येथे 11 वी 12 वी नीट,जेईई सारख्या परीक्षांच्या तयारी करता येत असतात परंतु काल अकोल्यात घडलेला प्रकार हा अकोल्याच्या शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारा असून सरस्वतीच्या मंदिरात एका विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे करत विनयभंग करण्याचा प्रकार वसिम चौधरी नामक नराधम प्राध्यापकाने केला असून या दोषींवर कठोर कारवाई करत कोणत्याही पक्षाच्या राजकीय दबावाला पोलीस प्रशासनाने बळी न पडत निष्पक्षपणे चौकशी करत कारवाई करावी अशी मागणी भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष उमेश गुजर, सचिन देशमुख, पवन महल्ले, किरण अवताडे, प्रवीण डिक्कर, योगेश ढोरे, अभिजित बांगर, उज्ज्वल बामणेट, निलेश काकड,कुणाल शिंदे, अक्षय जोशी, भूषण इंदोरिया, रितेश जामनारे, अभिषेक भगत, वैभव मेहेरे, केशव हेडा, टोनी जयराज यांनी केली आहे.
भविष्याच्या प्रमुख वळणावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे हे नराधम काही राजकीय पक्षांच्या पाठबळावर आपली दुकानदारी चालवत मुलांना धमकावून वाट्टेल ते काम करून घेण्याच्या पुष्कळ घटना मागील काळात घडल्या असून पोलीस प्रशासनाने सगळ्या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी राजकीय पक्षाच्या दबावाला बळी पडून प्रकरण दाबण्याचा प्रकार जर झाला तर भाजयुमो तर्फे जन आंदोलन उभे करण्यात येईल असा ईशारा ही यावेळी देण्यात आला.