• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नाशिक : कात्रीने भोसकून सासूचा खून; पत्नी, मुलीवर हल्ला

Our Media by Our Media
May 23, 2022
in Featured, गुन्हा, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
101 1
0
murder crime
39
SHARES
731
VIEWS
FBWhatsappTelegram

नाशिक (घोटी): पतीने रागाच्या भरात पत्नी, सासू व आपल्या अल्पवयीन मुलीवर विळा व कात्रीने केलेल्या हल्ल्यात सासू जागीच ठार, तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड येथे रविवारी सकाळी घडली. पती मद्यपी असल्याने पत्नी माहेरी येण्यास टाळाटाळ करीत होती. त्यावरून पती-पत्नीत झालेले भांडण सासू व मुलगी सोडवत होती. त्या दरम्यान पतीने हा हल्ला केला.

त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या झारवड-जोशीवाडी येथे ही घटना घडली. पती किसन महादू पारधी (42, रा. कळमुस्ते-जांभुळवाडी, ता. त्र्यंबकेश्वर) याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी इंदुबाई किसन पारधी (36) काही दिवसांपूर्वी मुलगी माधुरी (12) हिच्यासह झारवड येथे माहेरी निघून आली होती. पतीच्या व्यसनामुळे ती सासरी जाण्यास टाळाटाळ करीत होती. त्या दोघींना घरी नेण्यासाठी किसन झारवडला आला होता. तो रविवारी सकाळी 9.30 वाजता पत्नी इंदुबाई यांना सासरी चलण्याचा आग्रह करू लागला. तेव्हा इंदुबाई स्वयंपाक करीत होत्या. त्या दरम्यान पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. किसन इंदुबाईला विळ्याने मारहाण करू लागला. या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी किसनच्या सासू कमळाबाई सोमा भुतांबरे (55) व मुलगी माधुरी या दोघी मध्ये पडल्या. मात्र, रागाच्या भरात किसनने कमळाबाई यांच्या पोटात व पाठीवर कात्रीने भोसकले, तर मुलीलाही जखमी केले. या हल्ल्यात कमळाबाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर इंदुबाई व माधुरी जखमी झाल्या.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन संशयित किसन पारधी याला जागीच पकडून ठेवले व या घटनेबाबत घोटी पोलिसांना माहिती दिली. जखमी इंदुबाई व माधुरी यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, घोटीचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व तपासाबाबत सूचना दिल्या. घोटी पोलिसांनी बाळा निवृत्ती भुतांबरे (27) याच्या फिर्यादीवरून संशयित किसन महादू पारधी याच्याविरुद्ध खून, जिवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक श्रद्धा गंधास यांच्यासह हवालदार कोरडे, शीतल गायकवाड, रवी जगताप आदी करीत आहेत. या घटनेने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Tags: CrimeMurdernashik crime
Previous Post

अकोला- शिक्षक म्हणाव की भक्षक अकोल्यातील नामांकित कोचिंग क्लासच्या संचालकाविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Next Post

अकोला- वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
sucide

अकोला- वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

milk1rp_

दुग्धव्यवसायाला आर्थिक स्थैर्य कधी? खासगी संस्थांनी खरेदीदरात घट करण्याचा घाट घातल्याने मोठी अडचण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.