• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा स्त्री रुग्णालयाव्दारे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ सुरु खाजगी रुग्णवाहिका वापराचा मिळणार मोबदला:नोंदणी आवश्यक

adil by adil
May 23, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, योजना, संपादकीय
Reading Time: 1 min read
87 1
0
download
14
SHARES
629
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला दि.22– गरोदर माता व नवजात बालक रुग्णांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी रुग्णवाहीका उपलब्ध व्हावे याकरीता जिल्हा स्त्री रुग्णालयाव्दारे ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ सुरु केले आहे. शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास खाजगी वाहन किंवा रुग्णवाहिका वापरता येईल. अशा वाहनाचे भाडे प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे संबधित रुगांनाच्या खात्यात रक्कम अदा केल्या जाईल. याकरीता रुग्णाला ॲप्सवर नोंदणी करणे आवश्यक राहिल, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक यांनी दिली.

प्रसुती पश्चात 42 दिवसपर्यंतच्या गरोदर माता व एक वर्षापर्यंतच्या नवजात बालकांना तातडीच्या उपचाराकरीता शासकीय व खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता रुग्णांना ‘बुक माय ई-व्हेईकल ॲप्स’ डाऊनलोड करुन नोंदणी करणे आवश्यक राहिल. ज्या रुग्णाने खाजगी वाहन किंवा रुग्णवाहिकेचा वापर केला असेल‍ अशा संबधीत रुग्णांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात पोहोचल्यानंतर बँकेचे पासबुक व आधारकार्डची झेरॉक्स प्रत जिल्हा स्त्री रुग्णालयात जमा करावी. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे वाहन भाडे ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल. शासकीय रुग्णवाहिकेचा वापर झाल्यास लाभ मिळणार नाही तर खाजगी वाहण किंवा रुग्णवाहिका वापर करताना ॲप्सवर नोंदणी करणे आवश्यक राहिल यांची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रादेशिक परिवहन विभागाने निश्चित केलेले दर याप्रमाणे :  मारूती व्हॅनचे महानगर पालिका क्षेत्रातील दर पाचशे रुपये प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगर पालिका क्षेत्र सोडून 1 हजार रुपये व जिल्ह्याबाहेर 11 रुपये प्रति कि.मी. प्रमाणे राहिल.  टाटा सुमो व मॅटॅडोरचे महानगर पालिका क्षेत्रातील भाडेदर सहाशे रुपये प्रती एक फेरी 25 कि.मी. पर्यंत,  महानगर पालिका क्षेत्र सोडून 1 हजार 400 रुपये तर जिल्ह्याबाहेर 12 रुपये प्रती कि.मी. प्रमाणे राहिल.  टाटा 407 किंवा स्वराज मझदाचे महानगर पालिका क्षेत्रातील भाडेदर सातशे प्रती  एक फेरी 25 कि.मी. पर्यंत, महानगरपालिका क्षेत्र सोडून 1 हजार 300 रुपये तर जिल्ह्याबाहेर 13 रूपये प्रती कि.मी. प्रमाणे राहिल. आय.सी.यु. अथवा वातानुकूलीत वाहनाचे महानगरपालिका क्षेत्र सोडून व जिल्ह्याबाहेर वातानुकूलीत यंत्रणा बसविली असल्यास नमूद दरात 15 टक्के वाढ देय राहिल. तसेच 100 कि. मी. च्या वर 15 रुपये प्रती कि.मी. प्रमाणे रक्कम संबंधीतांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने रक्कम जमा करण्यात येईल, असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

Tags: 'Book My E-Vehicle Apps'AmbulanceRegistrationWomen's Hospital
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा

Next Post

भविष्यात यंत्रमानवांचा वापर वाढणार; रोबोटिक्स क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
images

भविष्यात यंत्रमानवांचा वापर वाढणार; रोबोटिक्स क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज

petrol

माेठी बातमी : पेट्रोल 2 रुपये 80 पैसे , डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त : राज्य सरकारचा निर्णय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.