अकोला,दि. 22- माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात ही प्रतिज्ञा सामुहिकपणे घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सूचना प्रचारण अधिकारी अनिल चिंचोले तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.