अकोला,दि.21– एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीचे जतन, पारंपारीक नृत्य कलेला प्रोत्साहन व लोकनृत्याबाबत जागृती व्हावी याकरीता आदिवासी पारंपारिक नृत्य पथकाची नृत्य स्पर्धा घेण्यात येत आहे. ही स्पर्धा मंगळवार दि. 31 मे रोजी घेण्यात येणार असून नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याकरीता रविवार दि. 29 मेपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले.
आदिवासी नृत्यस्पर्धा शासकीय आश्रम शाळा कोथळी येथे घेण्यात येत असून इच्छुक नृत्य स्पर्धा पथक किंवा संस्थानी शासकीय आश्रम शाळा कोथळी येथे नोंदणी करावी. आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धामध्ये सहभागी होण्याऱ्या कलाकारांना येण्याजाण्याचा खर्च, मानधन, वेशभुषेचा खर्च हा शासकीय नियमाप्रमाणे अदा करण्यात येईल. तसेच विजेत्या संघाला प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस देण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.