अकोट(देवानंद खिरकर)- गरीब गरजु सामान्य लोकांची पुरेशी सोय करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोटचे उपजिल्हा रुग्णालय चे काम तोरीत मार्गी लावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी मा. पालकमंत्री अकोला मा. उपविभागीय अधिकारी आकोट मा.वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय आकोट यांना निवेदन देऊन संबंधित अधिकारी यांना इशारा दिला आहे आकोट शहारातील आंबोडीवेश येथील भिमराव बुलाजी तेलगोटे वय 53 त्यांची तब्बेत अच्यानक बिघडली असतांना त्यांना तोरीत नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे यांनी ग्रामीण रुग्णालय आकोट येथे ऍडमिट केले असता आकोट ग्रामीण रुग्णालय येथे पेसेंट ची गैरसोय होत असल्या कारणाने तेथील डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे रेफर करण्यास सांगितलं. कारण कोणते पण पेसेंट असो ग्रामीण रुग्णालय आकोट येथील डॉक्टर अकोला येथे रेफर करण्यास सांगतात कारण जशी पाहिजे तशी सुविधा पेशंट साठी आकोट ग्रामीण रुग्णालय येथे उपलब्ध नाही अकोला जिल्हा रुग्णालय येथे भिमराव तेलगोटे यांचा मृत्यू झाला.
जर आकोट ग्रामीण रुग्णालय येथे पेसेंट ची पुरेशी सोय झाली असती तर भिमराव तेलगोटे यांचा जीव वाचला असता. बऱ्याच वर्षां पासून आकोट ग्रामीण रुग्णालय ला उपजिल्हा रुग्णालय हा दर्जा मिळाला असुन अजुन परियंत सुद्धा रुग्णालय चे काम पूर्ण झाले नाही. याकडे शासनाने लक्ष द्यावे कारण सत्ताधारी पक्ष व नेते अस्या ठिकाणी लक्ष देत नसुन असे बरेच बळी आकोट ग्रामीण रुग्णालय मध्ये गोरगरीब सामान्य लोकांचे गेलेले आहेत व जात आहेत पुढे जर असंच चालू राहिले तर गरीब लोकांचे वाली कोण असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण गरीब सामान्य गरजु लोकांसाठी शासनाने सरकारी रुग्णालय काढलेले असुन जशी पाहिजे तशी सुविधा पेसेंट ला मिळत नसेल तर सरकारी रुग्णालय चा फायदा काय प्राव्हेट दवाखान्यात जशी सुविधा देण्यात येते तशी सुविधा गरीब व सामान्य लोकांना देण्यात यावी.
कारण काही गरीब गरजु लोकांजवळ पैसा नसल्याने सरकारी दवाखान्यात जाण्याची वेळ येते आणि पेशंट ची जशी पाहिजे तशी सोय होत नाही म्हणून काही नेत्यांना फक्त निवडणूक आली कि जाग येते बाहेर निघुन मतदान माघायची गरीब मरो यांना कोणताच फरक पडत नाही कारण अस्या नेत्यांना काय गरज पडते सरकारी रुग्णालय मध्ये जाण्याची कारण जावे लागते गरीब सामान्य लोकांना आता तरी शासनाने व आकोट मतदार संघांचे आमदार अकोला जिल्ह्याचे खासदार पालकमंत्री उपविभागीय अधिकारी वैद्यकीय अधिक्षक यांनी आकोट ग्रामीण रुग्णालय चे रखडलेले उपजिल्हा रुग्णालय चे काम पूर्ण करून घ्यावे गोरगरीब लोकांच्या हितासाठी रुग्णालय मध्ये नवीन सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करून डॉक्टर व इतर भरती प्रकिया करून ग्रामीण रुग्णालय चे काम पूर्ण करावे नाहीतर आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असे लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी निवेदन देते वेळी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला आहे.
सोबत विक्की तेलगोटे नितीन तेलगोटे नागेश वाहूरवाघ रामेश्वर दाभाडे प्रतीक तेलगोटे नवनीत तेलगोटे विशाल पडघामोल,राजु भोंडे,संदीप पोटे,अमोल तेलगोटे,मोंटू तेलगोटे,सतीश पोहरकार,रोहन दामले,सौरव पुंडकर,नितेश दामोदर, निलेश तेलगोटे, दुर्गेश देठे, मंगेश कंडाळे, सुरज तेलगोटे, सुगत तेलगोटे, अक्षय वानखडे, संकेत तेलगोटे, विकास तेलगोटे, अक्षय तेलगोटे, आनंद पळसपगार, धीरज पळसपगार, करण तेलगोटे, अभिजित भटकर, आनंद भटकर, विक्रम पळसपगार, चेतन इंगळे, अंकुश इंगळे,आदित्य सावंग,अजय सावंग यांचे नावे व सह्या आहेत.