अकोला– रब्बी हंगाम 2022-23 मध्ये हरभऱ्याची हमी भावाने खरेदी करण्यासाठी दि.16 फेब्रु 2022 पासून शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी प्रत्यक्ष खरेदी दिनांक 1 मार्च 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. हंगाम 2021-22 मधील हरभरा (चणा) खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शासनाने दि.17 मे 2022 ही अंतीम तारीख दिली आहे.
त्याकरीता जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंनी दि. 17 मे पर्यंत हरभरा (चणा) ची ऑनलाईन नोंदणी करून हमी भावाचा फायदा घ्यावा, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.