अकोट (देवानंद खिरकर) :- अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांचे संकल्पनेतून अकोला जिल्हा पोलीस दलांअतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनचे कामकाजात सुधारणा होऊन सर्वसाधारण जनतेस गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान होण्याचे दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे कार्यमूल्यांकण करण्यात आले. त्यामध्ये एप्रिल 2022 च्या कार्यमूल्यांकणात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळाला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन स्तरावर पारदर्शक कामाला गती व नागरिकांना सन्मान देण्याचे सकारात्मक कार्यामुळे ग्रामीण भागात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः गुन्ह्याचा आलेख,कारवाई सह कामकाज संबधीत मुल्याचे गुण देण्यात येतात.विशेष म्हणजे ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावाची संख्या व पोलिसांचे अपुरी बलसंख्या पाहता गावागावात ग्रामीण पोलीसांनी बैठक व जनसंपर्क वाढवून प्रत्यक्ष भेटीगाठी घेत उपक्रम राबविले.शातंता व कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी न्याय पुर्वक योग्यपणे काम करणारे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक आला आहे.कायदा,सुव्यवस्था साठी सतत विविध प्रयोग व प्रबोधन करणारे अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर ह्यांनी अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.