• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; महाविद्यालयांना कारणे दाखवा

adil by adil
May 9, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
89 1
0
MahaDBT-Scholarship
14
SHARES
644
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  अनुसूचित जाती, जमाती, वि.जा., भ. ज., इ. मा. व. , विमाप्र इ. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासा ठी महाडीबीटी या प्रणालीचा वापर होत असतो. या शिष्यवृत्ती योजनांच्या लाभासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. मात्र, पाच महिने उलटुनही अनुसूचित जाती प्रवर्गाचे 1473 व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 1960 अर्ज  असे एकूण 3433 अर्ज अद्यापही महाविद्यालयस्तरावरच प्रलंबित आहेत, या प्रकारास जबाबदार असलेल्या महाविद्यालयांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

यासंदर्भात सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नविन व नुतनीकरणाचे वरील योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा दि.14 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आली होती. वेळोवेळी शासनामार्फत शिष्यवृत्ती आवेदन पत्रे नोंदणीकृत करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2021-22 मध्ये महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी प्रारंभी 31 मार्चची मुदत होती. त्या कालावधीत अपेक्षित अर्ज न आल्याने पुन्हा 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, तरीही महाविद्यालयांनी गांभीर्य न दाखवल्याने आता 31 मे पर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत; दि. 31 मे ही अंतिम मुदत आहे. महाविद्यालयांनी संबंधीत अर्जाची पडताळणी करून पात्र अर्ज जिल्हास्तरावर तात्काळ पाठवावे. शिष्यवृत्ती लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालय प्राचार्यांची राहील, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी  केले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अर्ज प्रलंबित असलेले प्रमुख महाविद्यालयांची नावे याप्रमाणे-

श्री. संत गजानन महाराज आर्टस कॉलेज – 43, गुरुकृपा महाविद्यालय – 14, डॉ. वंदनाताई ढोणे नर्सिंग स्कुल -24, गर्व्हरमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट -34, गर्व्हरमेंट आयटीआय – 47, आझाद हिंद नर्सिंग स्कुल – 24, महात्मा फुले नर्सिंग स्कुल – 17, डॉ. वंदनाताई ढोणे नर्सिंग स्कुल – 60, राधीका नर्सिंग स्कुल – 34, ऐंजेल ऑफ मरसी इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग सायन्स – 42, आकांक्षा सोशल फेअर ॲण्ड एचआरडीए, इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन -77, श्री. सरस्वती माता ज्यु. कॉलेज मलकापूर – 12, सुधाकरराव नाईक आर्टस, सायन्स ॲण्ड उमाशंकर खेतान कॉमर्स ज्यु. – 11, श्री. शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स – 19, श्रीमती. पी.डी. पाटील सोशल वर्क कॉलेज खडकी -78, बाबू जगजीवनराम ज्यु. कॉलेज – 16, डॉ. मनोरमा ॲण्ड प्रा. एचएस पुंडकर आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज बाळापूर -13, श्री. शिवाजी हायस्कुल ॲण्ड ज्यु. कॉलेज – 15, गुलामनबी आझाद आर्टस, कॉमर्स कॉलेज बार्शीटाकळी – 15, उत्तमराव डहाके शिक्षण महाविद्यालय – 15, स्व. पांडूरंग पाटील नर्सिंग कॉलेज, बी.बी. सायन्स -11, गर्व्हरमेंट आयटीआय बार्शीटाकळी  -12, गर्व्हरमेंट आयटीआय मुर्तीजापूर -38, भारतीय ज्ञानपीठ व्हीआयडी  मुर्तीजापूर -15, श्री. गाडगे महाराज कॉलेज मुर्तीजापूर -40, माऊली ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स – 12, श्री. शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स – 11, एकूण 749

Tags: applications pendingCollegesscholarship
Previous Post

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ: कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

मनसे तेल्हारा शहर अध्यक्ष पदी श्याम माहोरे यांची  तर महीला आघाडी शहर अध्यक्षा पदी नंदा श्रीवास यांची निवड

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मनसे तेल्हारा शहर अध्यक्ष पदी श्याम माहोरे यांची  तर महीला आघाडी शहर अध्यक्षा पदी नंदा श्रीवास यांची निवड

मनसे तेल्हारा शहर अध्यक्ष पदी श्याम माहोरे यांची  तर महीला आघाडी शहर अध्यक्षा पदी नंदा श्रीवास यांची निवड

-fire-killsone

अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ शेजारील टॉवरला आग

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.