तेल्हारा(प्रतिनिधी)- अनेकांचे बळी घेणारा प्रसिद्ध मामा भाच्याच्या डोहाने एकाच आठवड्यात दुसरा बळी घेतला आहे. गेल्या तीन दिवस अगोदर अकोल्यातील १९ वर्षीय राज गुडदे नामक युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान मामा भाच्याच्या डोहात एका अनोळखी इसमाचे प्रेत तरंगत असल्याचे काही नागरिकांना दिसून आले याबाबत वारीचे सरपंच यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी लगेच हिवरखेड पोलिसांना फोन द्वारे माहिती दिली असून हिवरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दातीर हे आपल्या ताफ्यासह वारी हनुमान येथे घटनेची माहिती घेण्यासाठी रवाना झाले आहेत.या डोहाबाबत अनेक कागदी घोडे नाचवले गेले असून अद्याप पर्यंत मात्र कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासना विरुद्ध नाराजीचा सुरू उमटत आहे.