अकोट(देवानंद खिरकर)- पोलिस अधीक्षक जी.श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खालील विशेष पथकास अकोट परीसरात पेट्रोलिंग करत असतांना खात्रिशिर खबर मिळाल्या वरून अकोलखेड व मोहाळा मधील किराना दुकानामध्ये अवैध रित्या गुटखा विक्री केली जात आहेत.
त्यावरून गोपाल वासुदेव पदमने वय 38 वर्ष रा.अकोलखेड व मोहम्मद रफीक वय 40 वर्ष रा.मोहाळा यांच्या दुकानाची गुटखा बाबत झड़ती घेतली असता दोघांच्या दुकानात प्रतिबंधीत गुटखा,वाह,विमल,हॉट सितार,पानबहार यांचा 50,000 हजार रूपयांचा गुटखा जप्त करून वरील दोन्ही आरोपितावर पो.स्टे. अकोट ग्रामीण येथे गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे. सदर कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक जी.श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या पथकाने केली आहे.