अकोला– जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवार दि.8 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात करण्यात आले आहे. या मेळाव्यात 113 पदांसाठी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड चाकण, पुणे तसेच ईसाफ कॉ ऑपरेटीव्ह सोसायटी अकोला, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट, अकोला या कंपनीमार्फत निवड होणार आहे. त्यासाठी इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, डिजेल मेकॅनिक, फिटर, वेल्डर, पेंटर, शिट मेटल) उत्तीर्ण तसेच वय 18 ते 29 वर्षे दरम्यान असणाऱ्या युवक युवतींनी आपली प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र यांच्यासह स्वखर्चाने उपस्थित रहावे.
मेळाव्यातील मुलाखतींचे ठिकाण– महिंद्रा ॲण्ड महिंद्रा चाकण पुणे करीता लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. ईसाफ को- ऑपरेटीव्ह सोसायटी लि. अकोला व गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लि. अकोला करीता शैक्षणिक गुणवत्ता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला येथे संपर्क साधावा (दूरध्वनी; 0724-2433849) असे आवाहन करण्यात आले आहे.