हिवरखेड (धीरज बजाज)- येथे हिवरखेड ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत किंवा नगरपरिषद मध्ये व्हावे यासाठी गेल्या 22 वर्षांपासून हिवरखेडवासी विविध आंदोलनातून ही मागणी रेटून धरत आहेत मात्र या मागणीला आतापर्यंत पूर्ण यश आले नाही व वरिष्ठांनी पुन्हा आश्वासनाचे गाजर दाखवून व मंत्रालयात दि 10 ला बैठक आयोजित करून चौथ्या दिवशी प्रहरच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता करण्यात आली.
गेल्या 22 वर्षांपासून विविध सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यासह विविध सामाजिक संघटना , सामाजिक कार्यकर्ते यांनी वेगवेगळी आंदोलने , उपोषणे करून हिवरखेड येथे नगरपंचायत व्हावी यासाठी शासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. यामध्ये हिवरखेडच्या प्रथम महिला सरपंच सौ इंदिराताई इंगळे यांच्यापासून सुरू झालेला नगरपंचायतीच्या लढ्यात पुढे माजी सरपंच रामेश्वर शिंगणे, नलिनीताई राऊत, सुरेश ओंकारे , संदिप इंगळे , सुलभाताई दुतोंडे, प्रतिभाताई येऊल, शिल्पा भोपळे, अरुणाताई ओंकारे, सीमाताई राऊत या विविध सरपंचांनी व सर्व ग्राप सदस्यांनी आपापल्या कार्यकाळात नागरपंचायतिची मागणी रेटून धरली. अनेक ग्रामसभांचे, मासिक सभा, विशेष ग्रामसभा इत्यादींचे ठराव मंजूर झाले. आमदार अमोल मिटकरी यांनी अनेकदा विधिमंडळात आवाज बुलंद केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री बच्चूभाऊ कडू, अनिल गावंडे, इत्यादींनी सुद्धा आश्वासने दिली, गल्ली ते मुंबई पर्यंतच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
तर दुसरीकडे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना, हिवरखेड विकास मंच ,आदर्श पत्रकार संघटना, लोकजागर मंच , प्रेस क्लब, हिवरखेड तालुका निर्मिती समिती यासह सर्व संघटना तथा विविध पक्षांच्या माध्यमातून विविध आंदोलने करून हिवरखेड नागरपंचायतची मागणी शासन दरबारी रेटून धरली गेली. येथील सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज , अर्जुन खिरोडकार यांनी देखील सदर मागणीचा सतत पाठपुरावा करून विविध आंदोलने केली अर्जुन खिरोडकर यांच्या सहा दिवसाच्या आमरण उपोषणानंतर आता आणखी एकदा प्रहार जनशक्ती पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य रवी घुंगळ यांनी नागपंचायतीसाठी अन्नत्याग आंदोलन केले. या सर्व आंदोलन व उपोषणा नंतरही शासनाकडून मात्र आश्वासनांचे गाजरच हिवरखेड वासीयांच्या पदरी पडले आहे. यासंदर्भात येत्या दहा किंवा बारा तारखेला मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. अजूनही प्राथमिक उद्घोषणा न झाल्याने हिवरखेडवासी आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते. तत्पूर्वी शासनाने नगरपंचायतीची प्राथमिक उद्धघोषना करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
बॉक्स
मान्यता पाहिजे शिंदे साहेबांची, पण बैठक मात्र तनपुरे साहेबांची अन्नत्याग आंदोलन सोडविण्यासाठी दहा तारखेला राज्यमंत्री तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे पत्र देण्यात आले आहे. परंतु माहिती अधिकारातील माहितीनुसार आणि अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार हिवरखेड नगरपंचायत फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्यतेसाठी थांबलेली आहे त्यामुळे बैठक शिंदे साहेबांची पाहिजे होती मात्र तनपुरे साहेबांच्या बैठकीच्या पत्रात शिंदे साहेबांचा उल्लेखच नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि हा चॉकलेट देण्याचा नवीन प्रकार तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे.