वाडेगाव (डॉ चांद शेख)- वाडेगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा प सदस्य, श्री सचिन धनोकार यांची बाळापुर तालुका युवासेना उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. धनोकार यांची सामाजिक कामे पहाता त्यांची या पदी निवड करण्यात आली.
त्यांना नियुक्त पञ देतांना शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार श्री नितीनभाऊ देशमुख व युवासेना जिल्हा प्रमुख श्री दिपक बोचरे यांनी त्यांची निवड केली यावेळी वाडेगाव येथिल शिवसेना नेते श्री दिपकशेठ मसने, श्री. अरूणभाऊ पळस्कार, श्री. रंजित अहिर, श्री दत्ता मानकर, श्री अनंता काळे, मनिष मसने, निवृती म्हैसने, किशोर फाळके, ज्ञानु पाटिल मानकर, चेतन कारंजकर, यांच्यासह बाळापुर पंचायत समिती सदस्य व गटनेते श्री योगेश्वरभाऊ वानखडे पाटिल श्री बबलुबाप्पू देशमुख व युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री राहुलभाऊ कराळे यांच्या सह तमाम शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.