तेल्हारा:- गेल्या वर्षानुवर्षे सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या माम भाच्याच्या डोहात शेकडो जणांना बुडून मृत्यू झाला असून शासनाकडून तसेच नागरिकांकडून दक्षता घेण्यासाठी सांगण्यात येते मात्र ह्या बाबीला अनेक जण जुमानत नाही अशीच घटना आज घडली असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अकोल्यातील युवक दर्शनासाठी वारी हनुमान येथे आले होते.
काही मित्र मंदिराकडे होते तर काही मामा भाच्याच्या डोहाकडे अंघोळ करण्यासाठी गेले असता मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज गुडदे वय १९ वर्ष नामक रा सिंधी कॅम्प अकोला हा अंघोळ करीत असताना बुडाला याबाबत मित्रांनी आरडाओरड केली तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत सदर युवक बुडाला होता याबाबत वारी येथील सरपंच शिवा पतींगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन याबाबत हिवरखेड पोलिसांना माहिती दिली आहे.याबाबत पुढील तपास हिवरखेड पोलीस करणार आहेत.