अकोला -: (प्रती) भारतीय मौसम विभाग मुंबई यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र सहा जिल्ह्यात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी नागरिकांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे शारीरिक श्रमाची कामे टाळावीत अशक्तपणा डोकेदुखी चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षण आहे.
अशी लक्षणे दिसतात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्ह्यातील सर्व तसेच आरोग्य यंत्रणा दक्ष राहावे असे निर्देश अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत परंतु अकोला शहरातील वाहतूक कर्मचारी एवढ्या भर उन्हात चौकाचौकात उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यासाठी साधे ट्राफिक बूथ,छत्री पिण्याची पाण्याची व्यवस्था कुठल्या चौकात नाही, म्हणून आपणास नम्र विनंती आहे की वाहतूक कर्मचारी यांच्या करीता ट्रफीक बुथ, पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.