तेल्हारा: तेल्हारा येथील आत्मकेलश आंदोलनात सहभागी होण्यासाठी तेल्हारा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आला होता. या मार्च ची सुरुवात तेल्हारा डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानातुन करण्यात आली तेल्हारा ते थार,दहिगाव, पंचगाव,आडसूड फाट्यापर्यत अत्यन्त खराब व जीवघेण्या रस्त्यावर ही पदयात्रा पंचगव्हान ते थार 10 किमी काढण्यात आली.
ह्या आत्मक्लेश पदयात्रेचे नेतृत्व विकास पवार ह्यांनि केले तर या पदयात्रेला वंचित चे राज्य उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, वंचित चे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देडवे मा प्रदीप वानखडे आणि ऍड संतोष राहटे ह्यांनी मार्गदर्शन केले तेल्हारा शहर अध्यक्ष विकास पवार,सह सुरज वाघमारे, अरविंद तिव्हाणे, मो सलीम मो युनूस, रेहान खां, अशोक दारोकार, अजय बोदडे, संघर्ष बोदडे, नितीन पोहरकार, प्रशांत तायडे, प्रमोद बोदडे, सत्यपाल पंचांग, सचिन खिराडे,राहुल पोहरकार, शामराव पोहरकार, मनोज पोहरकार, साजन दामोदर, सुधीर पोहरकार, अविनाश पोहरकार, सतिष पोहरकार, सुरज पोहरकार, संघपाल भोजने, संदेश गवारगुरु,संघर्ष वानखडे, अर्जुन सोनोने, गौतम वानखडे, सिद्धार्थ दांडगे, प्रवीण पोहरकार, राहुल पोहरकार, सतिष मामनकार, रतन दांडगे, थोरात, सुभाष भड, नरेश बांगर, संदीप गवई, संघपाल बोदडे, झिया शहा, प्रफुल्ल सोनोने,आदी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग होत.
पालकमंत्री यांनी 6 महिन्यात काम पूर्ण करून देतो असे दिलेल्या शब्दाला जागले नसल्याने आणि अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावर निधि देऊन त्याच रस्त्यावर त्यांनी वंचित च्या विरोधात श्रमदान करायला गेले होते. म्हणून तेल्हारा तालुक्यातील आश्वासन देऊन पण अपूर्ण ठेवलेल्या रस्त्यावर श्रमदान करायला मा राज्यमंत्री बच्चू कडू हे येतील का असे बॅनर लावून आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली.