अकोट(देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत रामापूर येथील तलाठी ऑफिस बंद बाबत व तलाठी ऑफिस समोरील अतिक्रमण काढणे बद्दल लेखी तक्रार करण्यात आली होती. रामापूर येथील तलाठी ऑफिस समोर जगदेव शालीकराम मडावी,तुळशीराम बकाराम गजबे, बबन विठ्ठल टेकाम, जगन्नाथ काशीराम ढोक या चार लोकांनी अतिक्रमण केले होते.
या बाबत जिल्हाधिकारी, पालकमंत्री, उपविभागय अधिकारी,तहसीलदार यांचेकडे देवानंद खिरकर यांनी लेखी तक्रार केली होती. त्या तक्रार प्रमाणे तलाठी रामापूर यांनी ग्राम पंचायत सचिव यांना तलाठी ऑफिस समोरील अतिक्रमण काढून मोकळे करणे बाबत लेखी पत्र दिले होते. त्या पत्राप्रमाणे ग्राम पंचायत सचिव रामापूर यांनी गैरअर्जदार 1 ते 4 यांना नोटीस बजावली होती. व अखेर ग्राम पंचायत रामापूर यांनी रामापूर येथील तलाठी ऑफिस समोरील चारही लोकांचे अतिक्रमण काढलेले आहे व तलाठी ऑफिस समोरील जागा मोकळी केली आहे.परंतु तक्रार देऊन 1 महिना होऊन सुद्धा व पेपरला वृत्त प्रकाशित करून सुद्धा रामापूरचे तलाठी हे रामापूर येथील तलाठी ऑफिस उघडून अद्यापही मुख्यालयी हजर झाले नाहीत ही ऊलेखनिय बाब आहे.अकोट तहसीलदार यांनी रामापूरचे तलाठी राजेश बोकाडे यांना रामापूरचे तलाठी ऑफिस उघडण्याचे आदेश दिले असतांना रामापूरचे तलाठी यांनी फक्त 2 दिवस रामापूरचे तलाठी ऑफिस उघडून साफसफाई केली व थातूर मातूर 2 दिवस ऑफिस उघडले नंतर पुन्हा रामापूरचे ऑफिस हे बंदच असते.
या बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी अर्जदार यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जाची चौकशी करून संबंधित कर्मचारी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करणे गरजेचे आहे अशी मागणी अर्जदार यांनी केली आहे.तरी रामापूर येथील तलाठी राजेश बोकाडे हे रामापूर येथील तलाठी ऑफिस उघडून मुख्यालयी हजर होतात की नाही याकडे अर्जदार यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
मी रामापूर येथील तलाठी ऑफिस बंद बाबत व अतिक्रमण काढणे बाबत लेखी तक्रार केली होती.त्या प्रमाणे रामापूर सचिव यांनी चारही लोकांचे अतिक्रमण काढले आहे.परंतु रामापूरचे तलाठी हे तलाठी ऑफिस उघडून अद्यापही मुख्यालयी हजर झालेले नाहीत.
देवानंद खिरकर अर्जदार
प्रतिक्रिया
रामापूर येथील तलाठी ऑफीस समोरील अतिक्रमण मोकळे करणे बद्दल तलाठी यांनी दिलेल्या पत्राप्रमाणे चारही लोकांचे अतिक्रमण काढले आहे.या नंतर तलाठी ऑफिस समोर अतिक्रमण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी तलाठी यांची राहील.
पायघन सचिव रामापूर