अकोट(शिवा मगर)- जिल्हयातील असा एक तालुका जिथे अनेक मोठे विषय उदयास येतात त्यात राजकारण असो कायदा सुव्यवस्था त्यामध्ये गेल्या काही वर्षात भ्रष्टाचार असो की भ्रष्टाचारी कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पुढाकार घेऊन सामान्य व्यक्ती पुढे सरसावत आहे आज असेच एक प्रकरण घडले असून गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले तहसील कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्यावर लाच लुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली.
अकोट तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या तसेच न प प्रशासकीय पदाचा कार्यभार असलेल्या हरीश गुरव नामक नायब तहसिलदार पदाच्या अधिकाऱ्याने वाळूच्या गाडीचा हप्ता कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती तसेच कारवाई करणार नाही त्यासाठी कुबेर दर्शन कराव लागेल असे हा नायब तहसीलदार याने तक्रारदार यास सांगितले त्यावरून तक्रारदार या बाबीला बळी न पडता थेट लाच लुचपत विभागाकडे गेला आणि तक्रार केली आज रोजी सायंकाळी तडजोड झालेली रक्कम आठ हजार स्वीकारत असताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ हा बडा अधिकारी पकडला मात्र या कारवाईने महसूल विभागातील वाळूचा मलिदा खाणारे अनेकांचे धाबे दणाणले आहे.हरीश गुरव याचेविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कार्यवाही विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाप्रवि. अमरावती, अरूण सावंत,अपर पोलीस अधिक्षक, लाप्रवि. अमरावती,. देवीदास घेवारे, अपर पोलीस अधिक्षक, लाप्रवि. अमरावतीयांचे मार्गदर्शनात पो.नि. सचिन सावंत, पो. नि. नरेंद्र खैरनार व पोना. प्रदिप गावंडे, पोशि. निलेश शेगोकार
यांनी केली.