अकोला दि.26: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत यांच्याकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीदारांना कर्ज परतफेड करता यावी यासाठी एकरकमी परतावा योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेत लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व कर्जमुक्त व्हावे,असे आवाहन महामंडळाचे अकोला जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.