तेल्हारा:- तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील सुखदेव पुंडलिक खर्चे वय ६५ वर्ष यांनी आमरण उपोषण ला आज सुरुवात केली असून त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे जस्तगाव येथील वार्ड नंबर ३ च्या शासकीय मुख्य रस्ता ३० फुटावरील होत असलेला रोड एकसाईड होत असल्याने तातडीने काम थांबविण्या बाबत तक्रार अर्ज त्यांनी दिली त्यावर महिना उलटला तरी कार्यावाही झाली नाही.
त्यामुळे वार्ड नंबर ३ च्या चुकीच्या सुरु असलेल्या रोड च्या कामाबाबत तक्रार अर्ज दिला ज्यात स्पष्ट उल्लेख केला आहे की ग्रामपंचायत च्या शासकीय मोजमापा नुसार असलेला हा वार्ड नंबर ३ चा मुख्य रोड हा ३० फुटाचा आहे त्यामुळे त्या रोड वर होत असलेला कॉंक्रीट रोड हा मध्यभागातून होणे गरजेचे आहे मात्र तसे न होता सदर रोड हा एकसाईड करण्यात येत असल्याने सदर बाब हि माझ्या लक्षात आली, त्यामुळे याबाबत जस्तगाव ग्रामपंचायत चे ग्रामसचिव,सरपंच यांना भेट घेऊन त्यांना कळविले असता त्यांनी काहीही कानावर घेतले नाही त्यामुळे एका प्रकारे सदर रोड करण्यास मूकसंमती दिली आहे त्यामुळे एकसाईड राहणाऱ्या सर्व नागरिकांना हा सदर अन्याय झालेला आहे करिता सदर रोड हा मध्य भागातून होणे हे कायदेशीर आहे मात्र रोड एक साईड का केला जात आहे ह्याचे उत्तर कुणाकडे हि नाही त्यामुळे जर सदर रोड झाल्यास त्याचा उपयोग हा दोन्ही साईड कडील नागरिकांना होणार नाही मात्र एक साईड रोड झाल्यास त्याचा लाभ दुसऱ्या कडील साईड कडील रहिवाशी नागरिकांना होणार नाही त्यामुळे हा एक प्रकारे अन्याय आहे .
तरी सदर मनमर्जी सुरु असलेल्या या रोड चे कामचे तातडीने थांबविण्याचे आदेश देऊन सदर रोड हा मध्य भागातून करण्याचे आदेश देण्यात यावे असे निवेदनात नमूद केले होते मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्ता थांबविण्याचे आदेश न झाल्याने शेवटी तक्रार दार यांनी 25 एप्रिल पासून आमरण उपोषण बसण्याचा इशारा दिला होता त्यामुळे सदर उपोषण आता सुरू केले आहे यात आता सम्बधित अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे तक्रार दार यांनी निवेदनाच्या प्रतीलिपी मा.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री दिल्ली खासदार संजय धोत्रे, आमदार माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर जिल्हाधिकारी अकोला उपविभागीय अधिकारी अकोट, पोलीस अधीक्षक अकोला ,जिल्हा परिषद अध्यक्षा, तहसीलदार तेल्हारा बी.डी.ओ तेल्हारा यांना दिल्या आहेत.