अकोला– खारपाणपट्ट्यातील अकोला तालुक्यातील आपोती खुर्द, बुद्रुक व आपातापा या गावातील जलसंधारण कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी नदीतील गाळ काढणे हा कार्यक्रम लोकसहभाग व शासकीय यंत्रणा यांनी दि.१ मे पासून करावे. तसेच विशेष बंधारा या खारपट्ट्यामध्ये करणे शक्य आहे किंवा कसे याबाबत अभ्यास करावा व पंजाबराव कृषी विद्यापीठ मधील तज्ञांना बंधारा पूर्वीची पीक परिस्थिती व नंतर च्या पीक परिस्थितीबाबत अहवाल तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधिताना दिले. यावेळी खारपाणपट्ट्यातील काही शेतकऱ्यांनी सिंचन व फळबाग विकसित केली त्याबाबत सुद्धा क्षेत्रीय पाहणी करण्यात आली.
अकोला तालुक्यातील आपोती खुर्द, बुद्रुक व आपातापा गावातील जलसंधारण संदर्भात अभ्यास दौरा पाहणी करण्यात आली. यावेळी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विविध विभागाचे डीन तसेच प्राध्यापक, तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे अभियंते व कृषी विभागाचे अधिकारी तसेच सरपंच व विशेष बंधाऱ्याचे प्रणेते श्री अपोतीकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी खारपाण पट्ट्यात सिंचन व जलसंधारण यासंदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांची माहिती जाणून घेतली. यात खारपाण पट्टा कसा तयार झाला, त्यामधील पाण्याची गुणवत्ता व शेतातील जमिनीची गुणवत्ता तसेच जलसंधारणाच्या एरिया ट्रीटमेंट व ड्रेनेज ट्रीटमेंट व सॉल्ट टॉलरन्स क्रॉप तसेच पीक पद्धती भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा निशारीकरण प्रकल्प याबाबत सखोल माहिती देण्यात आली. तसेच आपत्ती खुर्द गावामध्ये विशेष बंधारा बांधून दोनशे एकर ओलिताखाली आणली आहे. त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची व मनुष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना पाण्याच्या गुणवत्तेबाबत माहिती दिली. असेच प्रयोग खारपाणपट्ट्यातील करताना काय काळजी घ्यावी, याबाबत नदी व नाल्यामध्ये मध्ये येणारा येवा व बाष्पीभवन तसेच इव्हापो ट्रान्सपीरेशन व डेड स्टॉक त्याद्वारे उपलब्ध होणारा जलसाठावर जमिनीची पोत याबाबतची विविध विभागांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. या बंधाऱ्यात आऊट फ्लकी॑ग झाल्यामुळे त्यावर काय उपाय योजना करता येतील याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.