तेल्हारा(प्रतिनिधी)- सध्या भोंगा अजाना यात सम्पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे काही समाज कंटक आपली राजकीय पोळी भाजण्याचे दृष्टीने हे घाणेरडे राजकारण करत आहे मात्र विविध शहरांत गावात सर्वसामान्य हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय आपला सामाजिक एकोपा जपत एकजुटीने राहून आपले नाते घट्ट करीत आहेत त्यात कुणीही आग लावू शकत नाही त्यातीलच एक उदाहरण आले तेल्हारा शहरांतील इंदिरा नगर येथे पाहायला मिळाले भाजप नेते गजानन गायकवाड यांचे संकल्पेतून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आणणारे एकता मंडळाचे वतीने एकता इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले धर्माच्या शिकवणी नुसार.
ईश्वरोपासना, दानधर्म उपवास (रोजा) मक्केची यात्रा आणि शुचीर्भूतपणा ही तत्त्वे अंगीकारणाऱ्या इस्लामीधर्मात रमजान हा पवित्र महिना मानला जातो, दरवर्षीप्रमाणे रमजान या पवित्र महिन्याच्या औचित्याने तेल्हारा शहरातील इंदिरा नगरातील भाजप नेते गजानन गायकवाड व माजी नगरसेविका सौ आरतीताई ग. गायकवाड यांच्या सह एकता मंडळाच्या वतीने 18 एप्रिल रोजी हिंदू मुस्लिम एकताद भावनापूर्ण इफ्तारपार्टी आयोजनात केली होती यात मुस्लिम व हिंदू बांधवांनी ऊस्फर्त प्रतिसाद देऊन एकतेचे दर्शन घडविले.
तेल्हारा इंदिरा नगरात प्रभाग 8 मधील मदिना मस्जिद तसेच भारत नगरातील चारमिनार मस्जीद मध्ये सामुहिक नमाज अदा करण्यात आल्यावर इंदिरा नगरातील सभागृहात आयोजित इफ्तार पार्टीत रोजे ठेवणार्यांनी फराळाचा लाभ घेतला.
आयोजित इफ्तार पार्टीस मिळालेला प्रतिसाद व प्रगटलेला उत्साह हिंदु-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा ठरला,यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, शहरध्यक्ष महेंद्र गोयनका, शहरसरचिटणीस रवि गाडोदिया, गजानन गायकवाड, माजी नगरसेवक नरेश आप्पा गंभीरे,विजय देशमुख,भाजयुमो शहरध्यक्ष गणेश इंगोले,रवि शर्मा,श्रीराम बागलकर,अशपाक भाई,शंकरराव वाघमोडे, आजम भाई,अशोक गव्हाळे,अफसर शहा,शिवहरि खेट्टे, शिवा अमृतकार,हुशेन शहा,विक्रम गायकवाड, युसुफ भाई,सचिन मोहोड,हमिद भाई,शेख राजु,बाबुलाल चाफे,गुडन भाई,मौलाना, साहब ,फिरोज भाई,शेख गुलजामा यांच्यासह मोठ्यासंख्येने मुस्लिम बांन्धव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले,भाजपा शहर सरचिटणीस गजानन गायकवाड यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे व उपस्थितांचे आभार मानले.