दानापूर (सुनिलकुमार धुरडे)- दानापूर येथून पासून 5 की ,मी अनंतराव असलेल्या सौंदळा, बादखेड येथील प्रसिद्ध असलेल्या अंबिका देवी संस्थानवर कोरोना च्या संकटा नंतर यंदा ३ वर्षानंतर चैत्र १६, १७ एप्रिल रोजी भव्य यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी देवीची पूजा अर्चना ,पालखी काढण्यात आली, दुपारी काट्यावरील लोटांगण, संध्याकाळी गाढे ओढणे, रात्री १२ ला नाळे टोचणे हा कार्यक्रम पार पडला ह्या जुन्या परंपरा पाहण्यासाठी यात्रेचा जास्त प्रचार न झाल्यावरही हजारो भाविकांनी गर्दी केली व अंबिका देवी चे दर्शनासह यात्रेचे लाभ घेतला. अंबिका देवी भक्ताची मनोकामना पूर्ण करते भक्त आपले पाग फेडण्या करिता दूर दुरून यात्रेत येतात कोरोना काळा मुळे ही यात्रा बंद झाली होती .
त्यामुळे भक्तांचा हिरमोळ झाला होता, यंदा सर्वत्र शासनाने खुले केले आणि यात्रेला प्रारंभ झाला. हजारो महिला भाविकांनी मातेला आरत्या दिल्या पुरुष भाविकांनी दर्शनासाठी रिग लावल्या , कोंबडा ,बोकडं बळी या ठिकाणी देण्याची प्रथा बंद झाल्याने भाविकांनी रोडग्याचा नैवघ देवीला दाखवून नवस फेडला. अंबिका देवी संस्थानच्या वतीने सुद्धा भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुंदीचा 11 क्विंटल प्रसाद भाविकांना देण्यात आला. सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली, संस्थानच्या वतीने मातेच्या दर्शनाचा लाभ घेणाऱ्या भाविकांनासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
लाखो श्रद्धाळूनि मातेचरणी आपले पाग फेडून महाप्रसादाचा लाभ घेतला, अंबिका देवीच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळाल्याने भाविकांनमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले, अशाप्रकारे शांततेत सौदळा यात्रा पार पडली. यावेळी अकोट चे आमदार प्रकाश भारसाकडे उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर, जिल्हा परिषद सदस्य गजानन काकड, सरपंच ,अंबिका देवी संस्थान अध्यक्ष नवल कुमार अरबट, पोलीस पाटील राजेंद्र चनेकर ,तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण शित्रे, पटवारी टेलगोटे मॅडम, कुंजीलाल टावरी अंबिका देवी संस्थान चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हिवरखेड पोलीसाचा चौख बंदोबस्त
पंचक्रोशीत ओळखल्या अंबिका देवी च्या यात्रेला हिवरखेड पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी हिवरखेड, सोनाळा, दानापूर रस्त्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिवरखेड ,तेल्हारा, अकोट येथून पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.
कोड:1) गेल्या 3 वर्षांपासून अंबिका देवीची यात्रा बंद होती मात्र शासनाने कोरोना नियम उठवल्याने यावर्षी देवीची यात्रा व दर्शनाचा लाभ मिळाला.
महेश विखे
भाविक दानापूर