• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड नगरपंचायत करण्याची तीन मंत्र्यांची आश्वासने हवेतच विरली का ? नागरिकांमध्ये घोर निराशा!

adil by adil
April 16, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, राजकारण
Reading Time: 1 min read
119 1
0
Hivarkhed Nagar Panchayat
18
SHARES
856
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (धीरज बजाज)-  हिवरखेड नगरपंचायतसाठी मागील 25 वर्षांपासून सामूहिक संघर्ष सुरू असून हिवरखेड नगरपंचायत करण्यासाठी तीन- तीन मंत्र्यांनी दिलेले शब्द, आश्वासने, वचन हवेतच विरल्याने 40000 हिवरखेड वासियांचा हिरमोड झाला आहे.

आ. अमोलजी मिटकरी यांनी अनेकदा विधिमंडळात याबाबत आवाज बुलंद केला आहे. व सातत्याने ही मागणी शासन दरबारी रेटून धरली आहे. अनेक पत्रकार बांधव, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तत्कालीन अनेक सरपंच, ग्रा प सदस्य, जागरूक नागरिक, व संबंधित सर्व जण मागील अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. 15 ऑगस्ट 2021 पासून अ भा ग्रामीण पत्रकार संघाचे अर्जुन खिरोडकार यांनी आमरण उपोषण केले होते. त्यांच्यासोबत हजारो नागरिकांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला होता. त्यावेळी नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी लवकरात लवकर आणि पालकमंत्री श्री. बच्चूभाऊ कडू यांनी दोन ते तीन महिन्यात नगरपंचायत करण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते. पण दोन महिन्याऐवजी आठ महिने झाले. पण ह्या दोन्ही मंत्र्यांची आश्वासने व शब्द हवेतच विरले.
तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषदेत 9 मार्च रोजी उत्तर देताना 1 महिन्याच्या आत हिवरखेड नगरपंचायतची प्राथमिक उद्घोषणा करणार असल्याची ग्वाही दिली होती. परंतु एक महिन्याच्या कालावधी निघून गेल्यावर सुद्धा घोषणा झालीच नाही.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

एकंदरीत ह्या तिन्ही मंत्र्यांची आश्वासने हवेतच विरल्याने जनतेला आश्वासन रुपी “चॉकलेट” मिळाल्याची सर्वत्र चर्चा आहे. दुसरीकडे महाराष्ट्र दिनापूर्वी हिवरखेड नगरपंचायतची घोषणा करावी. अन्यथा इच्छामृत्यूची परवानगी द्यावी असे पत्र एका सामाजिक कार्यकर्त्यांने सर्व वरिष्ठांना दिले आहे. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना नगरपंचायत करण्याबाबत पत्र दिलेले आहे. नगरपंचायतसाठी आजपर्यंत आमरण उपोषणे झाली, अनेक आंदोलने झाली, निदर्शने झाली, बाजारपेठ बंद झाली, सोशल मिडियावरही गांधीगिरी झाली. महाराष्ट्रात स्वतःचे सरकार असल्यावरही त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागला. नगरपंचायत होण्यासाठी आतापर्यंत अनेक ग्रामसभा, विशेष ग्रामसभा, व मासिक सभेचे अनेक सकारात्मक ठराव सहित परिपूर्ण प्रस्ताव पोहोचलेले आहेत.

परंतु तब्बल दीड महिन्यापासून हिवरखेड नगरपंचायत मान्यतेसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहीची प्रतीक्षा होत असल्याची चर्चा आहे. कारण की नगर विकास विभागातील संबंधित अधिकार्‍यांकडून पूर्ण प्रक्रिया करून हिवरखेड नगरपंचायतची फाईल 2 मार्चपासून नगर विकास मंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठविलेली आहे. अशी माहिती माहिती अधिकारात नगर विकास विभागाने सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांना दिली आहे.

 बॉक्स  रोखणारे ठरत आहेत वरचढ ?

हिवरखेड नगरपंचायत चा दीर्घ संघर्ष पाहता आतापर्यंत नगरपंचायत व्ह्यायला पाहिजे होती. वजनदार मंत्र्यांची आश्‍वासने सुद्धा वारंवार हवेत विरत असल्याने आणि विधानपरिषदेत मंत्र्यांनी दिलेला शब्द निर्धारित कालावधीत पूर्ण केल्या जात नसल्याने हिवरखेड नगरपंचायत ची मागणी करणाऱ्यांपेक्षा हिवरखेड नगरपंचायत रोखण्यासाठी तत्पर असलेले काही विघ्न संतोषी लोक वरचढ ठरत आहेत काय? अशी शंका कुशंका नागरीकांच्या मनात घर करत असून सर्वत्र तर्कवितर्क लावून कुजबुज सुरू आहे.

Tags: Great disappointment among citizens!Hivarkhed Nagar Panchayat
Previous Post

सातारा : सदावर्ते सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत

Next Post

श्रीराम उत्सव समिती तेल्हाराने जोपासला सामाजिक एकोपा !

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Shri Ram Utsav

श्रीराम उत्सव समिती तेल्हाराने जोपासला सामाजिक एकोपा !

ST workers

एसटी ककर्मचाऱ्यांची फसवणूक, संशयीत गावंडे म्हणतो, माझीच फसवणूक झाली...!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.