• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

यंदा देशात ९९ टक्के पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 14, 2022
in Amravati, Buldhana, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
104 1
0
पाऊस
16
SHARES
747
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे; नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पहिला अंदाज आज गुरुवारी भारतीय हवामान विभागाने जाहीर केला. यंदा मान्सून सामान्य राहील. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. २०२२ मध्ये पावसाची दीर्घकालीन सरासरी (एलपीए) ९९ टक्के राहण्याची शक्यता आहे. १९७१-२०२० या कालावधीत संपूर्ण देशात मान्सून हंगामातील पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी एवढी आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला निना परिस्थिती आहे. ला निनाची स्थिती पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यंदा संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी ९९ टक्के बसणार असून तो सामान्य राहील (९६ ते १०४ टक्के), अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यंदा मान्सून कसा राहील याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण उन्हाळा अति तीव्रतेने जाणवत आहे. महापत्रा यांनी सांगितले की, यंदा देशात सर्वदूर ९९ टक्के पाऊस पडेल. मात्र पूर्वोत्तर राज्यात तो सरासरीपेक्षा कमी पडेल तर राजस्थान बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांत तो सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे.

मान्सून कधी येईल?

मान्सून नेमका कधी येईल याबाबत महापत्रा यांनी सांगितले की, मान्सून केरळात नेमका कधी येईल ते आत्ताच सांगता येणार नाही. आम्ही १५ मे रोजी ती तारीख जाहीर करणार आहोत.

ला नीना आणि आयओडी स्थिती चांगली

महापात्रा यांनी सांगितले की, यंदा व व भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) ची स्थिती सकारात्मक असून असल्याने देशात पाऊस चांगला होईल. मात्र ऑगस्टनंतर ला नीना तटस्थ होणार आहे. त्या पुढची स्थिती आम्ही दर महिन्याला सांगणार आहोत. यंदा देशात खूप जास्त तापमान आहे. त्याचा मान्सूनवर चांगला अथवा वाईट परिणाम होईल काय? या प्रश्नाचे उत्तर देताना महापत्रा म्हणाले की, खूप जास्त तापमान किंवा कमी तापमानाचा मान्सूनची थेट संबंध नाही. १९७१ ते २०२० इतक्या वर्षातील पावसाच्या आकडेवारीवर यंदाचा अंदाज आम्ही दिला आहे.

भारताचा उत्तरेकडील भाग, मध्य भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील अनेक भागात, देशाचा वायव्य भाग आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

संपूर्ण देशात मान्सून (जून ते सप्टेंबर) सामान्य म्हणजे दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) ९६ ते १०४ टक्के राहण्याची शक्यता आहे. १९७१-२०२० च्या डेटावर आधारित, भारतातील वार्षिक पर्जन्यमानात मान्सूनचा ७४.९ टक्के वाटा आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यातील मान्सून हंगामात अनुक्रमे १९.१ टक्के, ३२.३ टक्के, २९.४ टक्के आणि १९.३ टक्के पावसाचे योगदान आहे. १९६१-२०१० मधील डेटाच्या तुलनेत हे आकडे बदलत राहिले आहेत.

Previous Post

पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हादौरा

Next Post

दोन वर्षांच्या ब्रेक नंतर तेल्हारा शहरासह तालुक्यात भिमोत्सव थाटात !

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम;विविध स्पर्धाचे आयोजन

दोन वर्षांच्या ब्रेक नंतर तेल्हारा शहरासह तालुक्यात भिमोत्सव थाटात !

सौरभ वाघोडे

थोर समाज सुधारक डॉ1. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांचे चरित्र प्रेरणादायी- सौरभ वाघोडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.