अकोला – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवार दि.14 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-गुरुवार दि.14 रोजी सकाळी साडेदहा वा. नगरपरिषद अकोट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दिव्यांगांना फ़िरते विक्री केंद्र वितरण कार्यक्रम, स्थळः- प्रभाग क्रमांक 16, संकल्प कॉलनी अकोट. सकाळी 11 वा. 10 मि. नगर परिषद तेल्हारा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती (ऑनलाईन पद्धतीने) व दिव्यांगाना फिरते विक्री केंद्र वितरण कार्यक्रम (ऑनलाईन पद्धतीने), स्थळः- नगर परिषद कार्यालय, अकोट. दुपारी 12 वा. 5 मि. नी. अकोला कडे प्रयाण, दुपारी 1 वा. 5 मि. नी. अकोला मनपा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती स्थळः- प्रभाग क्रमांक 8, साईनगर डाबकी रोड, दुपारी दीड वा. बाळापूर कडे प्रयाण, दुपारी दोन वा. नगर परिषद बाळापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळः- प्रभाग क्रमांक 1 नवा नगर बेलदारपूरा बाळापूर, दुपारी दोन वा. 20 मि. नी अकोला मार्गे बार्शी टाकळी कडे प्रयाण, दुपारी तीन वा. 5 मि. नी नगर परिषद बार्शी टाकळी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ ः- वार्ड क्रमांक 3, अशोक नगर बार्शी टाकळी, दुपारी 3 वा. 20 मि. नी. मुर्तिजापूरकडे प्रयाण, दुपारी सव्वा चार वा. नगर परिषद मुर्तिजापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र वितरण कार्यक्रम, स्थळः- प्रभाग क्रमांक 8, त्रिमुर्ती नगर, मुर्तिजापूर, दुपारी चार वा.50 मि. नी. अमरावतीकडे प्रयाण.