अकोला– गुरुवार दि.14 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये गुरुवारी (दि.14) कायदा सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.