• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गोरक्षकांवर हल्लाप्रकरणी हिवरखेड कडकडीत बंद,दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी व गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

adil by adil
April 12, 2022
in Featured, अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
113 1
0
Hivarkhed
20
SHARES
815
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज)-  गोरक्षकांवरील हल्ला प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करावी, गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारावर कार्यवाही करावी अशी मागणी करीत घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी हिवरखेड कडकडीत बंद पाळण्यात आला.

सविस्तर असे की दि 9 एप्रिल रोजी पहाटे दानापूर परिसरात 40 गोवंशांना वाचविल्यावर पोलिसांसह, बजरंग दलाचे कार्यकर्ते व शेतकरी युवक गुरांना हिवरखेड पोलीस ठाण्यात आणत असताना सोनवाडी फाट्याजवळ गोतस्करांनी मोठा जमाव आणून गोरक्षकांवर आणि पोलिसांवर हल्ला करून 40 पैकी 36 गोवंश घेऊन पसार झाले होते. यावेळी झालेल्या मारहाणीत अनेक गोरक्षक जखमी झाले होते तर दुसऱ्या गटातील एक व्यापारी सुद्धा जखमी झाला होता.
तत्पूर्वी पशुप्रेमींनी दिनांक ९ च्या रात्री दोन वाजता पोलिसांना गोवंशाचे तस्करी होत असल्याची माहिती सुद्धा दिली होती . परंतु एवढे गंभीर प्रकरण असूनही ठाणेदार स्वतः घटनास्थळी गेले नाहीत. पोलिसांचा स्टाफ कमी असल्याने घटनास्थळी फक्त तीनच पोलीस गेले त्यामुळे त्यांनी शेतकरी लोकांना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना गुरे हाकलत पोलीस ठाण्यापर्यंत सोबत चलण्याची विनंती केली. दुसरीकडे गोतस्करांनी मोठा जमाव आणून हल्ला केला. त्यांनी पोलीस शिपायांना लोटालाटी करून पशु प्रेमींनवर हल्ला चढविला.
या हल्ल्यादरम्यान तस्करांनी 40 पैकी 36 गुरे घेऊन गेले तर चार गुरे पोलीस ठाण्यात सुखरूप आणली गेली. पशुप्रेमींनी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य केले. आणि या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचे नाव सुद्धा सांगितले व 40 गोवंश पकडल्यावर तो सूत्रधार हजर असतानाचा व्हीडिओ सुद्धा दाखविल्याचे म्हटले.                                                                                                                                                 परंतु उलटपक्षी गोरक्षकांवरच गुन्हे दाखल झाले दुसरीकडे हल्ला करणाऱ्या मोठ्या जमावापैकी फक्त 7   जनांवरच गुन्हे दाखल झाले. इतर हल्लेखोर व मुख्य सूत्रधार आरोपीवर कोणतीच कार्यवाही झाली नाही. या निषेधार्थ बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी तेल्हारा येथे कडकडीत बंद ठेवून जाहीर निषेध पुकारला. मंगळवारी हिवरखेड ची बाजारपेठ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवण्यात आली. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अनेक प्रश्न उपस्थित:-
पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेलेली 36 गुरे जप्त करण्यात आली काय?
त्या गुरांचे काय झाले?
गोरक्षकांनी पोलिसांना मदत केल्यावरही यांच्यावरच खोटे गुन्हे का दाखल झाले?
मुख्य सूत्रधार आरोपीचे नाव गोरक्षक सांगत असले तरी त्याच्यावर कार्यवाही का नाही?
ज्या 3 पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालत गो तस्करांकडून आलेल्या जमावाचा सामना केला त्यांची फिर्याद घेण्याऐवजी घटनास्थळी हजर नसलेल्या ठाणेदारांनी फिर्याद का दिली असावी?
इतके गंभीर प्रकरण असूनही ठाणेदार स्वतः घटनास्थळावर तात्काळ का पोहोचले नाहीत?
असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Tags: akola newsDemand for strict closure of Hivarkhed in case of attack on cattle guards
Previous Post

हवामान अंदाज : यलो अ‍ॅलर्ट! ‘या’ जिल्ह्यांत गारपिटीसह पाऊस पडणार

Next Post

राज्यावरील वीज संकट गडद! ज्या ठिकाणी वीज चोरी त्या ठिकाणी भारनियमन : ऊर्जामंत्री नितीन राऊत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नितीन राऊत

राज्यावरील वीज संकट गडद! ज्या ठिकाणी वीज चोरी त्या ठिकाणी भारनियमन : ऊर्जामंत्री नितीन राऊत

उन्हाळी सुट्टी

विद्यार्थांना खुशखबर : २ मे पासून उन्हाळी सुट्टी ; १३ जूनपासून शाळा सुरू होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.