अकोला- समाज कल्याण पुणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार दि. 6 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक सप्ताहनिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत ऑनलाईन वेबीनार व जात प्रमाणपत्र पडताळणी एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय साळवे यांनी केले.
अकरावी व बारावी, सीईटी, डिप्लोमा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 11 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 1 दरम्यान https://meet.google.com/gix-ypsr-dje या संकेतस्थळावर गुगल मिट प्रणालीव्दारे वेबीनार आयोजीत करण्यात आले. तसेच दि. 13 एप्रिल रोजी राधादेवी तोष्णीवाल महाविद्यालय, अकोला येथे एक दिवसीय जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. या शिबीरात जात पडताळणीचा परिपुर्ण ऑनलाईन अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे तसेच मुळ कागदपत्रांसह हजर राहावे. या दिवशी समितीतील अधिकारी व कर्मचारी महाविद्यालयात उपस्थित राहून अर्ज स्विकारुन वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करतील.
अकरा व बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी झाले नाही त्यांनी जात पडताळणी शिबीरात आवश्यक कागदपत्रांसह शिबीरात उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.