अकोला -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान महाडिबिटी प्रणालीवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्याकरीता शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांने शनिवार दि. 30 एप्रिलपर्यंत महाडिबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले.
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती योजना व व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनाकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत 2021-22 शैक्षणिक वर्षातील महाडिबिटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता नविन व नुतनीकरण अर्ज भरण्यांची सुविधा दि. 14 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करुन देण्यांत आली आहे. अनुसुचित जाती , विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फि, परिक्षा फी तसेच व इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर शनिवार दि. 30 एप्रिलपर्यंत करावा.
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ वरीष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी मागासवर्गीय प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सूचित करावे. एकही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवेशितकरीता महाडिबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहिल. मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तरी जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनाचा लाभ घेण्याकरीता महाडिबिटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे कळविण्यात आले आहे