तेल्हारा(प्रतिनिधी)- नादेड मध्ये राजस्थानी समाजातील एका कर्तुत्ववान सामाजीक कार्यकर्ता, उद्योजक संजय बियाणी यांचेवर भरदिवसा दोन अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाला.
भर दिवसा एका व्यक्तीवर गोळीबार होतो ते ही खंडणीसाठी हे निंदणीय आहे.जे मारेकरी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून योग्य ती शिक्षा व्हावी व समाजातील उद्योजक यांना सुरक्षा पुरवावी भविष्यात अशी घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेऊन नांदेडमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही सर्व राजस्थानी समाज बांधव निषेध करतो व मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,मा. पालक मंत्री अकोला जिल्हा मा. जिल्हाधिकारी साहेब, अकोला यांच्याकडे.
यावेळी मीतेश मल्ल हरीकिशन चितलांगे प्रकाश मथारीया प्रवीण वैष्णव गणेश शर्मा रवी गाडोदीया ओम सुईवाल सागर शर्मा राजेश चांडक रामदेव फापट तुशार राठी मुरारी सोनी दर्शन राठी विषाल जोशी हरीष टावरी सुरेश मंत्री आनंद राठी प्रकाश अग्रवाल रवि शर्मा अशोक राठी जितेन्द्र चांडक हीमांशु राठी अमित मंत्री यश शर्मा यांच्या सह तेल्हारा शहराती ल बहुतांश राजस्थानी बांधव उपस्थित होते